दिल्लीत जाऊन आरक्षणाची मर्यादा हटवा

दिल्लीत जाऊन आरक्षणाची मर्यादा हटवा

Published on

दिल्लीत जाऊन आरक्षणाची मर्यादा हटवा
हर्षवर्धन सपकाळ यांचे भाजपला आव्हान
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : ‘भाजपला राज्यात प्रचंड मोठे बहुमत असून, त्यांनी दिल्लीत जाऊन आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी आणि राजधर्माचे पालन करीत तातडीने मराठा समाजाला आरक्षण देण्याची घोषणा करावी,’ अशी मागणी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

टिळक भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सपकाळ म्हणाले, ‘मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे समाजासह मुंबईत पोहोचत असताना सरकारने या आंदोलनात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. आता केवळ एक दिवसाची परवानगी दिली. ती हास्यास्पद असून तीन महिन्यांआधी आंदोलनाची घोषणा केली होती, तर सरकार इतके दिवस झोपा काढत होते का?’ त्यांनी पुढे सांगितले, ‘सत्तेत येताच सात दिवसांत मराठा आरक्षण देतो, अशी भीमगर्जना देवेंद्र फडणवीस यांनी केली होती, त्याचे काय झाले? धनगर समाजाला मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत आरक्षण देण्याचे आश्वासन फडणवीसांनी दिले होते, त्याचे काय झाले? एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना नवी मुंबईत रात्रीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर शपथ घेऊन गुलाल उधळला होता, त्याचे काय झाले? या प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजेत. आज जे तीन पक्ष सत्तेत आहेत तेच त्या वेळीही सत्तेत होते,’ असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
............
जातनिहाय जनगणना हा रामबाण उपाय
आरक्षणावर जातनिहाय जनगणना हा रामबाण उपाय आहे, हे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी स्पष्ट केले असून, त्यासाठी त्यांचा आग्रहही आहे. काँग्रेसशासित तेलंगणा व कर्नाटकात जातनिहाय जनगणना केलेली आहे. भाजप सरकारमध्ये जर इच्छाशक्ती असेल तर त्यांनीही जातनिहाय जनगणना करावी आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
..........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com