शिस्तबद्ध रेल्वे स्थानक हवीच

शिस्तबद्ध रेल्वे स्थानक हवीच

Published on

शिस्तबद्ध रेल्वेस्थानके हवीच
गणेश आरासमधून डोळे उघडणारा संदेश; टिपली रेल्वेस्थानकाबाहेरील कोंडी
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २८ ः डोंबिवली, कल्याण, कुर्ला, घाटकोपर, दादर, नालासोपारा अशा प्रमुख स्थानकांबाहेर प्रवाशांनी पाऊल टाकताच त्यांना फेरीवाले, अनियंत्रित वाहनांची गर्दी आणि वाहतूक कोंडीचा विळखा बसतो. लोकलच्या डब्यांतील प्रचंड गर्दीमधून बाहेर पडल्यावरही स्टेशनबाहेर प्रवाशांना श्वास घेणे कठीण जाते. प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करीत असते. याकडे ठाकुर्लीतील रहिवासी रुपेश राऊत यांनी लक्ष वेधले आहे. गणेश आरासमधून त्यांनी रेल्वे स्थानकाबाहेरील वास्तविक दृश्य उभे केले आहे.
ठाकुर्लीतील मंगलमूर्ती गॅलेक्सी येथील रहिवासी रुपेश राऊत यांनी रेल्वेस्थानकाबाहेरील गर्दीचे वास्तव चित्र टिपले आहे. डोंबिवली, कल्याण, ठाणे, घाटकोपर, कुर्ला, दादर, बोरिवली आणि नालासोपारा अशा प्रमुख स्थानकांबाहेर अनधिकृत फेरीवाले, अनियंत्रित रिक्षा-टॅक्सी थांबा, रस्त्यावर वाहनांची कोंडी यामुळे प्रवाशांचे हाल होतात. हा देखावा साकारण्यात त्यांना वैभव रोडे, महेश नेमळकर, मंगेश तेली, राहुल दळवी, हर्षद उकर्डे, अश्विनी सुशांत भोवड, प्राजक्ता प्रवीण केळुसकर, सायली रोडे, तेजश्री तेली, पल्लवी राऊत, तृप्ती अभिजित बिल्ले, सोनाली पाटील, ओंकार वैंगणकर यांनी मदत केली आहे.

विमानतळाप्रमाणे शिस्तबद्ध रांगा असाव्यात
याविषयी जागरूक नागरिक रुपेश राऊत यांनी सांगितले, की सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट आदेश दिला की फेरीवाल्यांनी स्थानकापासून किमान १५० मीटर अंतरावर राहावे. मात्र स्थानिक महापालिका आणि प्रशासनाकडून या आदेशाची अंमलबजावणी पुरेशी होत नसल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आहे. या पार्श्वभूमीवर गर्दीची रेल्वेस्थानके फेरीवालेमुक्त, स्वच्छ आणि सुरक्षित व्हावीत. तसेच रिक्षा-टॅक्सीसाठी विमानतळाप्रमाणे शिस्तबद्ध रांगा असाव्यात, जेणेकरून प्रत्येक प्रवासी सन्मानाने, सुरक्षितपणे आणि सोयीस्करपणे प्रवास करू शकेल, असा संदेश मंडळाने देखाव्यातून दिला आहे.

दरवर्षी सामाजिक जाणीव निर्माण करणारी सजावट साकारण्याची परंपरा राऊत यांनी यंदा ही जपली आहे. याआधी त्यांनी टोकियो ऑलिंपिक स्टेडियमची प्रतिकृती साकारून खेळाडूंना सन्मान दिला होता. टाटा हॉस्पिटलची प्रतिकृती उभारून कॅन्सरविषयी जागरूकता केली होती. तर कल्याण-डोंबिवली येथे आयटी पार्क उभारावे, अशी संकल्पना मांडून लोकल गाड्यांवरील प्रचंड गर्दीकडे लक्ष वेधले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com