फोर्टमध्ये साकारले राजस्थानच्या श्रीनाथजीचे मंदिर

फोर्टमध्ये साकारले राजस्थानच्या श्रीनाथजीचे मंदिर

Published on

फोर्टमध्ये साकारले राजस्थानच्या श्रीनाथजीचे मंदिर
सर्वधर्म समभावाचे प्रतीक
कुलाबा, ता. २८ (बातमीदार) ः दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध असलेल्या फोर्टचा राजा या गणेशोत्सव मंडळाने यंदा राजस्थानच्या श्रीनाथजी मंदिराचा देखावा बनवला आहे. श्रीकृष्णाच्या रूपात असलेली गणेशमूर्ती भाविकांचे लक्ष आकर्षित करीत आहे. हे मंडळ वर्षभर सामाजिक उपक्रम राबवण्यातही अग्रेसर आहे.
छत्रपती शिवाजी टर्मिनसपुढे असलेला फोर्टचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यंदा ६४ वे वर्ष आहे. मूर्तिकार निखिल खातू यांनी २४ फुटांची गणेशाची भव्यदिव्य व आकर्षक मूर्ती बनवली आहे, तर श्रीनाथजी मंदिराचा देखावा रेखाचित्रकार संतोष महिंद यांनी काढलेला आहे. या गणेश मंडळाचा गणपती पाहण्यासाठी राज्य आणि जगभरातून भक्तगण येतात. महत्त्‍वाचे म्हणजे, कुलाबा आणि फोर्टमध्ये विविध समुदायाचे लोक राहतात. त्यामुळे राजाच्या आरतीसाठी मराठी, गुजराती, राजस्थानी, मारवाडी, ख्रिश्चन भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात. मराठी आणि विशेषतः भारतीय संस्कृती टिकून ठेवण्याचे काम फोर्टचा राजा मंडळाने केले आहे.
दरवर्षी आरोग्य शिबिर, हळदी-कुंकू आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम मंडळाच्या वतीने घेण्यात येतात. यासोबत अनेक सामजिक उपक्रम मंडळाकडून राबविले जातात. सर्वधर्मसमभाव अशी ख्याती असलेल्या या मंडळाला केंद्रीय गृहराज्यमंत्री अमित शहा यांच्या पत्नी सोनल शहा या दरवर्षी आवर्जून भेट देतात. तसेच दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांचे स्‍वीय सहाय्यक शंतनू नायडू यांच्यासह विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील आवर्जून राजाच्या दर्शनासाठी येतात, असे मंडळाचे अध्यक्ष अमोल अशोक जाधव यांनी सांगितले.
या वेळी विदर्भातील नंदुरबार येथे एका गणेशभक्ताने फोर्टच्या राजाची भलीमोठी रांगोळी काढून आपले प्रेम व्यक्त केले. मंडळामध्ये दररोज सकाळ-संध्याकाळी आरती, मोरया नामाचा गजर सुरू असतो, आरतीला मोठ्या प्रमाणात तरुण-तरुणी आवर्जून उपस्थित राहतात.

वर्षभर मंडळाच्या माध्यमातून वैद्यकीय कॅम्प घेणे, वृक्षलागवडीसाठी जनजागृती, गरजूंना मदत, विद्यार्थ्यांसाठी क्रिकेट स्‍पर्धा यासारखे अनेक सामाजिक उपक्रम सुरूच असतात. इर्शाळवाडी व माळीण दुर्घटनेच्या वेळी मंडळाने मदत केली होती.
- अमोल जाधव,
अध्यक्ष, फोर्टचा राजा

राज्यातून तसेच जगाच्या कानाकोपऱ्यातून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससमोरील फोर्ट परिसरात असलेल्या फोर्टच्या राजा गणपती मंडळाला भक्तगण आवर्जून भेट देतात. सर्व जाती-धर्माचे लोक विभागात राहतात. त्यामुळे फोर्टचा राजा जातीय सलोख्याचे प्रतीक ठरला आहे.
- पराग कोळी,
उपखजिनदार, फोर्टचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com