दीड दिवसाच्या गणरायाला निरोप

दीड दिवसाच्या गणरायाला निरोप

Published on

दीड दिवसाच्या गणरायाला साश्रुनयनांनी निरोप
ठाणे जिल्ह्यात ४३,६८४ गणेशमूर्तींचे विसर्जन; पर्यावरणपूरक व्यवस्थेला प्रतिसाद
ठाणे, ता. २८ : ढोल-ताशांच्या गजरात, गुलाल उधळत व भक्तिभावाने ठाणे जिल्ह्यातील ४३,६८४ गणेशमूर्तींना गुरुवारी सायंकाळपासून निरोप देण्यात आला. या वेळी पावसाच्या सरींनीही हजेरी लावली होती तरी भाविकांच्या उत्साहात कुठेही कमतरता जाणवली नाही. यंदा ठाणे महापालिकेने विसर्जनासाठी व्यवस्था केली होती. तलावांचे प्रदूषण टाळण्यासाठी कृत्रिम तलाव, टाकी व फिरती विसर्जन केंद्रे उभारण्यात आली होती. एकूण १३४ ठिकाणी व्यवस्था होती.

वाजत गाजत, ढोल-ताशांच्या गजरात, टाळ-मृदंगाच्या निनादात बुधवारी गणपतीचे घरोघरी तसेच सार्वजनिक मंडळात आगमन झाले. मनोभावे पूजाअर्चना केल्यानंतर दीड दिवसाच्या गणपतींना निरोप देण्यात आला. ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर तसेच ग्रामीण भागातील रस्त्यांवर गुरुवारी सायंकाळपासून बँजो, ढोल आणि ताशांच्या गजरात गुलाल उधळत मिरवणुका काढण्यात आल्या. दीड दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर जिल्ह्यातील ४३ हजार ३३४ गणेशमूर्तींचे बुधवारी विसर्जन करण्यात आले.

यंदाही ठाणे शहरात गणेशमूर्तींच्या विसर्जनामुळे तलावांचे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने गेल्यावर्षीपेक्षा दीडपट जास्तीची विसर्जन व्यवस्था केली आहे. यंदा २३ कृत्रिम तलाव, ७७ टाकी विसर्जन व्यवस्था, १५ फिरती विसर्जन केंद्रे, नऊ खाडी घाट विसर्जन व्यवस्था आणि १० मूर्ती स्वीकृती केंद्रे अशी एकूण १३४ ठिकाणी विसर्जन व्यवस्था करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यात दीड दिवसाचे सहा गणपती सार्वजनिक मंडळांत, तर उर्वरित ४३ हजार ६७८ घरगुती गणपती होते. यातील ठाणे परिमंडळ १ आणि ५ या क्षेत्रांत तीन सार्वजनिक तर १५ हजार ८८८ घरगुती गणपतींचा समावेश होता. विसर्जन घाटावर सकाळपासून पोलिसांसह महापालिकेचे कर्मचारीदेखील बंदोबस्तासाठी तैनात केले होते. तर निर्माल्य संकलित करण्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली होती.

उत्सवात भक्तिभाव, शिस्त आणि सामाजिक बांधिलकी
या वर्षी ठाणे जिल्ह्यात शिस्तबद्ध आणि पर्यावरणपूरक उत्सवाचे दर्शन घडले. फुलांची सजावट, पारंपरिक वाद्यांच्या तालावर नाचणारे भाविक, बाप्पाला वंदन करणारी भक्तिमय व मूक आरास या साऱ्यातून सणासोबत सामाजिक जागरूकतेचेही दर्शन घडले.

गणेशमूर्तींचे परिमंडळनिहाय आकडे
परिमंडळ सार्वजनिक घरगुती
परिमंडळ १ (ठाणे) ० ४,१३५
परिमंडळ २ (भिवंडी) १ ४,७९०
परिमंडळ ३ (कल्याण) १ १३,०२०
परिमंडळ ४ (उल्हासनगर) १ ९,९८०
परिमंडळ ५ (वागळे इस्टेट) ३ ११,७५३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com