राष्ट्रीयस्तरावर बॅडमिंटनचे स्वप्न पाहणाऱ्‍या जान्हवी महालेला महापालिकेची मदत कधी?

राष्ट्रीयस्तरावर बॅडमिंटनचे स्वप्न पाहणाऱ्‍या जान्हवी महालेला महापालिकेची मदत कधी?

Published on

बॅडमिंटनपटू जान्हवीला महापालिकेची मदत कधी?
राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू होण्याचे स्‍वप्न; हलाखीची आर्थिक परिस्थिती
मुंबई, ता. २८ : महापालिकेच्या शाळेत दहावीपर्यंत शिक्षण घेऊन राष्ट्रीय स्तरावर बॅडमिंटनपटू होण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्यासाठी मुंबईसोडून हैदराबाद येथे सराव करणाऱ्या जान्हवी महालेला महापालिका प्रशासनाने अद्यापही कोणतीच आर्थिक मदत उपलब्ध करून दिली नाही. त्यामुळे तिच्या या बॅडमिंटनपटू होण्याच्या संघर्षात तिची आणि आईचीही मोठी धडपड सुरू आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन आपल्याच विद्यार्थिनीला मदत कधी उपलब्ध करून देणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

जान्हवीची मुंबई महापालिकेच्या वरळी सी फेस महापालिका शाळेतून बॅडमिंटन खेळाडू म्हणून निवड करत त्यासाठी तयारी केली. पुढे चुनाभट्टी शाळेत दाखल होताच तिने बॅडमिंटनमध्ये चमकदार कामगिरी केली. तिच्यातील बॅडमिंटन खेळातील कौशल्य पाहून त्या वेळी महापालिका शाळेने तिला पाठबळ दिले तेव्हापासून तिच्या प्रवासाला सुरुवात झाली; मात्र वेळोवेळी आर्थिक परिस्थितीमुळे तिच्यासमोर अनेक अडथळ्यांचा डोंगर उभा राहिला असून, त्यासाठी तिला आर्थिक पाठबळाची मोठी गरज असल्याचे जान्हवीची आई अर्चना महालेंकडून सांगण्यात आले. अर्चना महाले यांचे कुटुंब गिरगाव चौपाटीसमोरील खत्री चाळीत पत्र्याच्या घरात राहते. मुंबईत बॅडमिंटनसाठी योग्य प्रशिक्षण आणि अकॅडमी नसल्याने त्यांनी मुंबईसोडून थेट हैदराबाद गाठले. तिथे एका भाड्याच्या खोलीत आई-मुलगी राहत आहेत. आपल्या उदरनिर्वाहासाठी अर्चना महाले या शिकवण्या घेऊन सर्व खर्च सांभाळत आहेत.

खर्च भागवणे आवाक्याबाहेर
जान्हवीच्या प्रशिक्षणाची मासिक फी सुमारे १० हजार रुपये आहे. बॅडमिंटनसाठी लागणाऱ्या शटलकॉकचा खर्च पाच हजार आहे. यात आवश्यक आहार आणि पोषणाचा खर्च परवडत नसल्याने कसंतरी दोन वेळचे जेवण भागवले जाते. राष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय स्पर्धांसाठी प्रवास, राहणीमान आणि जेवणाचा खर्च त्यांच्या आवाक्याबाहेरचा आहे. त्यामुळे ती आजही तीन वर्षांपूर्वी घेतलेल्या जुन्या कपड्यांवर खेळत असल्याचे अर्चना महाले यांनी सांगितले.


जान्हवी राष्ट्रीय स्तरावर बॅडमिंटन खेळाडू म्हणून मुंबई आणि महाराष्ट्राचा नावलौकिक करू शकते. तिच्यात ती धमक आहे, मात्र तिच्या सरावासोबत इतर खर्चासाठी आम्हाला खूप ओढाताण करावी लागते. मी स्वत: नोकरी करते, मात्र कधीकधी पैसे नसल्यास तिचा सराव बंद ठेवण्याची वेळ येते. परिणामी अनेकदा काही स्पर्धांना तिला मुकावे लागते. यामुळे तिच्या भवितव्यासाठी आम्हाला मोठी आर्थिक गरज आहे.
- अर्चना महाले, जान्हवीची आई


आत्तापर्यंत जान्हवीची कामगिरी
२०१७ ऑल इंडिया पात्रता फेरीचा शेवटचा राउंड (गोवा)
२०१८ महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धा उपांत्यपूर्व फेरी (नाशिक)
२०१८ ऑल इंडिया पात्रता मिळाली आणि नंतर मुख्य ड्रॉ (हैदराबाद)
२०२१ गोवा राज्य अजिंक्यपद स्पर्धेत तीन वेळा अंडर १९ विजेतेपद
२०२१ ऑल इंडिया मुख्य ड्रॉमध्ये खेळली
२०२२ गोवा राज्य अजिंक्यपद स्पर्धा विजेतेपद
२०२२ मुख्य राष्ट्रीय स्पर्धेत महिला एकेरी गटात सहभाग
२०२३ गोव्यात दोन वेळा विजेतेपद
२०२४ दुखापत झाली आणि शस्त्रक्रिया झाली
२०२५ शस्त्रक्रियेनंतर गोवा राज्य अजिंक्यपद स्पर्धेत विजेतेपद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com