ॲड. सरिता खानचंदानी यांची आत्महत्या

ॲड. सरिता खानचंदानी यांची आत्महत्या

Published on

ॲड. सरिता खानचंदानी यांची आत्महत्या
इमारतीवरून उडी मारून जीवनयात्रा संपवली
उल्हासनगर, ता २८ (वार्ताहर) : उल्हासनगर येथील पर्यावरणप्रेमी व सामाजिक कार्यकर्त्या ॲड. सरिता खानचंदानी यांनी
गुरुवारी सकाळी विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यासमोरील एका इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. या घटनेमुळे उल्हासनगरात शोककळा पसरली आहे. मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांकडून पुढील कारवाई सुरू आहे.
''हिराली फाउंडेशन'' या संस्थेच्या संस्थापक-अध्यक्ष म्हणून त्यांनी उल्हासनगरमधील ध्वनी आणि जलप्रदूषणाविरुद्ध अथक संघर्ष केला. त्यांनी रात्री उशिरापर्यंत वाजणाऱ्या डीजेच्या मोठ्या आवाजाविरोधात न्यायालयात धाव घेतली होती आणि त्यांच्या प्रयत्नांमुळे शहरात ध्वनीप्रदूषण कमी करण्यास मदत झाली.
त्यांनी वालधुनी नदीच्या प्रदूषणाविरोधातही याचिका दाखल केली होती, ज्यामुळे नदी स्वच्छ करण्याच्या कामाला गती मिळाली. त्यांच्या निधनाने उल्हासनगरने एक जिद्दी आणि निस्वार्थ लढवय्यी गमावली आहे.
दरम्‍यान, सरिता खानचंदानी आत्महत्येचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, या घटनेने नागरिकांना मोठा धक्का बसला आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com