पनवेलच्या विकासाचा श्रीगणेशा
पनवेलच्या विकासाचा श्रीगणेशा
पाच महिन्यांत ४८३ कोटी तिजोरीत जमा
पनवेल, ता. ३० (बातमीदार)ः महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने यंदा विक्रमी कर वसुली केली आहे. १ एप्रिल २५ ते २९ ऑगस्टदरम्यान तब्बल एक लाख ३६ हजार ९६७ मालमत्ताधारकांनी ४८३.८ कोटींचा कर तिजोरीत जमा केल्याने पनवेलच्या विकासाचा श्रीगणेशा होणार आहे.
पनवेल महापालिकेच्या मालमत्ता कर विभागामार्फत ‘अभय’ योजनेअंतर्गत शास्ती माफीसाठीची मुदत वाढवण्यात आली आहे. १५ सप्टेंबरपर्यंत थकबाकीदारांना शास्तीवर तब्बल ९० टक्के सूट मिळणार आहे. या योजनेनुसार ३१ ऑगस्टपर्यंत मालमत्ता कर भरल्यास चालू वर्षाच्या करावर पाच टक्के सूट मिळणार आहे. या संधीचा फायदा घेण्याचे आवाहन उपायुक्त स्वरूप खारगे यांनी केले आहे. पालिकेकडून करदात्यांना ई-बिल स्वीकारणे आणि डिजिटल पद्धतीने कर भरण्यास प्रोत्साहित करण्यात येत आहे. याशिवाय ऊर्जा बचत, जल पुनर्भरण, कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरणपूरक उपक्रमात सहभागी होणाऱ्या करदात्यांसाठी दोन टक्के सवलतीची तरतूद केली आहे.
-------------------------------------
‘अभय’ योजनेला प्रतिसाद
१८ जुलै ते ३० ऑगस्ट या कालावधीत ‘अभय’ योजनेअंतर्गत ७८ हजार ४५ करदात्यांनी २५२.४४ कोटी रुपये भरले आहेत. मागील आर्थिक वर्षातील एकूण वसुली ४२४.७८ कोटी इतकी होती. त्या तुलनेत ऑगस्टअखेर ४८३ कोटींचा टप्पा पालिकेने ओलांडला आहे.
--------------------------------------
‘कर-मित्र’ चॅटबॉटची सेवा
करभरणा अधिक सोयीस्कर, वेगवान आणि पारदर्शक सेवा देण्यासाठी पनवेल महापालिकेने नुकतेच ‘कर-मित्र’ चॅटबॉट सुरू केला आहे. या आधुनिक प्रणालीद्वारे करदात्यांना घरबसल्या कराविषयी माहिती, मार्गदर्शन तसेच त्वरित मदत मिळणार आहे.
---------------------------
पनवेल पालिकेमार्फत अभय योजनेसह कर भरण्यासाठी अनेक सवलती देण्यात आल्या आहेत. मालमत्ताधारकांनी कर भरणा केल्यामुळे पालिकेच्या विकासकामांना गती मिळणार आहे. त्यामुळे थकबाकीदारांनी कर भरून पालिकेला सहकार्य करावे.
- मंगेश चितळे, आयुक्त, पनवेल पालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.