उत्‍सवानिमित्त नवी मुंबईत बेकायदा जाहिरातबाजी

उत्‍सवानिमित्त नवी मुंबईत बेकायदा जाहिरातबाजी

Published on

उत्‍सवानिमित्त नवी मुंबईत बेकायदा जाहिरातबाजी
शहर विद्रूपीकरणासह महापालिकेचा लाखो रुपयांचा महसूल बुडीत
तुर्भे, ता. ३० (बातमीदार) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील नामांकित कंपन्या आणि बिल्डर लॉबीकडून मोठ्या प्रमाणावर चौकांमध्ये बेकायदा जाहिरातबाजी होत असल्याचे उघड झाले आहे. गणेशोत्सव मंडळांच्या माध्यमातून जाहिरात फलक लावून कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनांची मोफत प्रसिद्धी केली असून, यामुळे एकीकडे शहर विद्रूपीकरण वाढले आहे, तर दुसरीकडे महापालिकेच्या महसूलावर मोठा फटका बसला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या सर्व प्रकाराकडे महापालिका अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
शहरातील सीबीडी बेलापूर, दिवाले गाव, अग्रोली, नेरूळ अक्षर चौक, गायमुख चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, वाशी नाका, तुर्भे स्टोअर, अरेंजा सर्कल, वाशी डेपो, सेक्टर १७, सेक्टर १५/१६, कोपरखैरणे डी मार्ट, ऐरोली सेक्टर पाच चौक, घणसोली आदी महत्त्वाच्या ठिकाणी गणेशोत्सव मंडळांच्या लगत मोठ्या प्रमाणात अनधिकृत जाहिरात फलक लावले गेले आहेत. या फलकांवर कंपन्यांसोबतच काही राजकीय नेत्यांचेही शुभेच्छा संदेश झळकत आहेत. काही मंडळांनी परवानगी घेतलेल्या कमानींसोबत अतिरिक्त कमानी उभारून जाहिरातींना प्रमुख स्थान दिले आहे. या जाहिरातींसाठी नामांकित कंपन्यांकडून मंडळांना देणग्या दिल्या जातात. त्यानंतर त्या कंपन्यांकडून फलक पुरवले जातात आणि ते मोक्याच्या ठिकाणी लावण्याची जबाबदारी मंडळांकडे सोपवली जाते. परिणामी, शहरभरात एकसारख्या जाहिरातींचा पाऊस पडल्याचे चित्र दिसत आहे.
.....................
कारवाईची मागणी
महापालिकेला जाहिरातींमधून दरवर्षी लाखो रुपयांचा महसूल मिळतो. मात्र सणांच्या आडून होणाऱ्या मोफत जाहिरातबाजीमुळे हा महसूल बुडीत जातो. नियमांनुसार अतिक्रमण विभाग किंवा संबंधित विभाग प्रमुखांवर यावर दंडात्मक कारवाई किंवा गुन्हा नोंदवण्याची जबाबदारी आहे. मात्र, राजकीय दबावामुळे अधिकारी या कारवाईपासून दूर राहात आहेत. आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com