चार्जिंग अभावी अवघ्या १७ इलेक्ट्रिक बसेस रस्त्यावर

चार्जिंग अभावी अवघ्या १७ इलेक्ट्रिक बसेस रस्त्यावर

Published on

ऐन गणेशात्सवात ठाण्यात बस डेपोतच
चार्जिंगअभावी अवघ्या १७ इलेक्ट्रिक बसेस रस्त्यावरः नागरिकांचा हिरमोड
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३० : ठाणेकरांना आरामदायी व गारेगार पर्यावरणपूरक प्रवास व्हावा, यासाठी इलेक्ट्रिक बसेसच्या माध्यमातून सेवा देण्यात येत आहे. मात्र, मागील काही दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळे कोपरी येथील इलेक्ट्रीक बस चार्जिंग स्टेशनमध्ये बिघाड झाला होता. त्यानंतर शुक्रवारी (ता. ३०) रात्री पुन्हा या चार्जिंग स्टेशनमध्ये बिघाड झाल्यामुळे १२३ पैकी अवघ्या १७ बसेसच रस्त्यावर धावल्याची माहिती समोर आली आहे.
ठाणे परिवहनच्या ताफ्यात ३५० च्या आसपास बस आहेत. त्यातील २१० बस या सीएनजी आणि डिझेलवर आहेत. तर नव्याने परिवहनच्या ताफ्यात १२३ इलेक्ट्रीक बस दाखल झाल्या आहेत. ठाणे पूर्व येथील या इलेक्ट्रीक बसचा डेपोत बसला चार्जिंग केले जाते. मागील आठ ते १० दिवसांपूर्वी सततच्या पावसाचा फटका याच चार्जिंग स्टेशनाला बसला होता. तसाच शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास तांत्रिक कारणांमुळे येथील वीज पुरवठा खंडित झाला. त्याचा परिणाम म्हणून १२३ पैकी केवळ १७ बस शनिवारी रस्त्यावर धावल्या. चार्जिंग स्टेशनचा वीज पुरवठा खंडित झाल्याने बस चार्जिंगच होऊ शकल्या नसल्याचे दिसून आले. त्यामुळे सकाळी बसचा ताबा घेण्यासाठी आलेल्या चालक आणि वाहकांना डेपोतच बसून राहण्याची वेळ आली. कोपरी येथील डेपोत तब्बल १०६ च्या आसपास बस उभ्या असल्याचे दिसून आले. या संदर्भात परिवहनचे व्यवस्थापक भालचंद्र बेहरे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी १७ इलेक्ट्रीक बस बाहेर पडल्याचे मान्य केले. यामुळे ऐन गणेशोत्सवात गणपती पाहणाऱ्यांच्या उत्साहावर विर्जन पडले आहे.

चार्जिंग स्टेशनमध्ये बिघाड
चार्जिंग स्टेशन येथील स्टेबिलायझार खराब झाल्याने व महावितरणच्या केबलमध्ये देखील बिघाड झाल्यामुळे येथील वीज पुरवठा खंडीत झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानुसार तो सुरळीत करण्यासाठी शनिवारी सकाळपासून महावितरणांचे पथक दाखल झाले. त्यानंतर दुपारी ३ वाजेनंतर वीज पुरवठा सुरळीत झाल्यानंतर सायंकाळी ४ वाजल्यापासून बसेस बाहेर पडतील, असा विश्वास देखील टीएमटी प्रशासनाने व्यक्त केला.

४ ते ५ लाखांचे नुकसान
इलेक्ट्रीक बस वगळता डिझेल आणि सीएनजीवर धावणाऱ्या बसच रस्त्यावर धावत होत्या. त्या देखील धिम्या गतीने धावत असल्याने त्याचा परिणाम उत्पन्नावर देखील झाल्याचे दिसून आले. चार्जिंग अभावी बसेस डेपोत उभ्या असल्यामुळे जवळपास चार ते पाच लाखांचे नुकसान झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com