रिक्षा थांब्यांवर युनियनची मनमानी

रिक्षा थांब्यांवर युनियनची मनमानी

Published on

रिक्षा थांब्यांवर युनियनची मनमानी
सर्वसमावेशक थांबे निर्माण करण्याची मागणी; प्रवाशांची गैरसोय
वाशी, ता. ३० (वार्ताहर) ः नवी मुंबईतील अनेक रिक्षा थांबे ठरावीक रिक्षा संघटनांच्या ताब्यात असून, या ठिकाणी इतर रिक्षाचालकांना प्रवेश मिळत नाही. परिणामी, इतर रिक्षाचालकांना प्रवाशांसाठी रस्त्यावर थांबावे लागते. शहरातील रिक्षा युनियनची मक्तेदारी वाढत असल्याने अनेक रिक्षाचालकांचा व्यवसाय प्रभावित होत आहे. त्यामुळे ठरावीक गटाची वाढती मक्तेदारी मोडण्यासाठी सर्वसमावेशक थांबे निर्माण करण्याची मागणी रिक्षाचालकांकडून करण्यात येत आहे.
शहरातील बस थांब्यांलगत, रेल्वेस्थानकांच्या बाहेर व महत्त्वाच्या मार्गांवर रिक्षा थांबे देण्यात आले आहेत; मात्र काही ठिकाणी संघटनांनी प्रशासनाकडे मागणी करून थांबे मिळवले आहेत, तर काही ठिकाणी संघटनांनी स्वतःचे वर्चस्व निर्माण केले आहे. या ठिकाणी संघटनेचे सदस्य नसलेले रिक्षाचालक थांबू शकत नाहीत. परिणामी, प्रवाशांना रस्त्यावर किंवा अवैध रिक्षा थांब्यावर प्रतीक्षा करावी लागते. शहरातील जास्त रहदारी असलेल्या मार्गांवर अवैध रिक्षा थांबे तयार झाले आहेत. शासनाने रिक्षा परमिट सर्वांसाठी खुले केले असले तरी शहरात रिक्षांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे थांबे कायमस्वरूपी समावेशक केले गेलेले नाहीत. अनेक ठिकाणी राजकीय दबावामुळे ठरावीक संघटनांना थांबे मिळतात, तर इतर रिक्षाचालक वंचित राहतात. वाशी-कोपरखैरणे मार्ग, नेरूळ रेल्वेस्थानक परिसर, दिघा-ऐरोली, सीबीडी व घणसोलीमध्ये अशा परिस्थिती सातत्याने निर्माण होत आहे.
...................
अलीकडे घडलेल्या घटनांमध्ये सीवूड्स परिसरातील चौकाजवळील थांब्यावर दोन संघटनांत वाद निर्माण झाला होता. नेरूळ रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेकडील थांब्यावर प्रवाशांना मीटर भाडे नाकारून फक्त शेअर भाडे स्वीकारले जाते. ठरावीक संघटनांच्या ताब्यातील थांबे रिक्षाचालकांच्या व्यवसायात अडथळा आणत आहेत. रिक्षाचालक संदीप यमकुरे यांनी सांगितले, की रिक्षा परमिट सर्वांसाठी खुले असूनही, काही संघटनांचा दबदबा रिक्षाचालकांना थांब्यावर बसण्याची मुभा देत नाही. सर्व रिक्षाचालकांना समाविष्ट करणे आवश्यक आहे. शहरातील सर्व रिक्षा थांबे सर्वसमावेशक करून कोणत्याही संघटनेच्या दबावाशिवाय कार्यान्वित करावेत, ज्यामुळे प्रवासी आणि रिक्षाचालक दोघांसाठीच सुविधा निर्माण होईल.
.....................
बॉक्स
शासनाने रिक्षा परमिट सर्वांसाठी खुले केले असूनही राजकीय दबावाखालील रिक्षा संघटना काही थांबे स्वत:च्या ताब्यात घेऊन इतर रिक्षाचालकांना थांब्यावर थांबण्याची मुभा देत नाहीत. त्यामुळे सर्व रिक्षाचालकांना समाविष्ट करणे अनिवार्य आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com