लोकसेवा आता फक्त एका क्लिकवर
उल्हासनगर, ता. ३० (वार्ताहर) : नागरिकांची धावपळ, फेऱ्या आणि कागदपत्रांची वणवण संपुष्टात येणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत उल्हासनगर महापालिकेने तब्बल ६८ सेवा ऑनलाइन करून नागरिकांच्या दारी आणल्या आहेत. पारदर्शकता, कार्यक्षमता आणि वेळेचे बंधन यांचा संगम असलेला हा उपक्रम शहरातील नागरिकांसाठी खऱ्या अर्थाने डिजिटल सुलभता घेऊन आला आहे.
उल्हासनगर महापालिकेने एकूण ५२ सेवा आपले सरकार पोर्टलवर उपलब्ध करून दिल्या आहेत. उर्वरित १६ सेवा थेट महापालिकेच्या संकेतस्थळावरून नागरिकांसाठी खुल्या केल्या आहेत. या सेवांमध्ये जन्म-मृत्यू दाखले, मालमत्ता कराशी संबंधित सुविधा, परवाने, प्रमाणपत्रे अशा विविध महत्त्वांच्या शासकीय सेवांचा समावेश आहे. प्रत्येक सेवेसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी, नियोजित कालमर्यादा व शुल्क निश्चित केले आहे. यामुळे नागरिकांना शासकीय कार्यालयांच्या उंबरठ्यावर न जाता घरबसल्या ऑनलाइन सेवा मिळणार आहेत. या उपक्रमामुळे शहर डिजिटल लोकसेवेकडे वाटचाल करत आहे. एक क्लिकवर लोकसेवा हे स्वप्न आता सत्यात उतरणार असल्याची प्रतिक्रिया उपायुक्त विशाखा मोटघरे यांनी दिली.
परदेशात राहणाऱ्यांनाही लाभ
विशेष म्हणजे परदेशात राहणारे नागरिकही स्वयंस्वाक्षांकित कागदपत्रे सादर करून या सेवांचा लाभ घेऊ शकतात. नागरिकांना सेवांचा लाभ घेण्याबरोबरच अर्जाची सद्यस्थिती, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे व शुल्क यांची माहिती २४ तास सात दिवस ९३०९७१६२४३ या व्हॉट्सॲप क्रमांकावरून सहज मिळणार आहे.
नागरिकांच्या दारी लोकसेवा पोहोचवणे ही आमची जबाबदारी आहे. महापालिकेच्या ६८ सेवांना ऑनलाइन देण्यात येत आहेत. पारदर्शकता, कार्यक्षमता आणि वेळेचे बंधन हीच या उपक्रमाची ताकद आहे. उल्हासनगरकरांना घरबसल्या प्रमाणपत्रे, दाखले, परवाने यांसारख्या सेवा सहज मिळतील. डिजिटल माध्यमातून प्रशासन व नागरिक यांच्यातील दरी कमी होऊन ‘एक क्लिकवर लोकसेवा’ ही संकल्पना वास्तवात उतरत आहे.
- मनीषा आव्हाळे, आयुक्त, उल्हासनगर महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.