सह्याद्री क्रीडा मंडळाने साकारला गजराजाचा देखावा
सह्याद्री क्रीडा मंडळाने साकारला गजराजाचा देखावा
चेंबूर, ता. ३१ (बातमीदार) ः देशातील विविध ऐतिहासिक स्थळे तसेच धार्मिक स्थळे उभारण्यात चेंबूर येथील टिळकनगर सह्याद्री क्रीडा मंडळाची ख्याती आहे. यंदा या मंडळाने गणेशभक्तांना गजराज कलाकृती स्वरूपात गणराजाचे दर्शन घडविण्याचा प्रयत्न केला आहे. या गजराज कलाकृती असलेल्या गणेशमूर्तीने सर्व भाविकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
भारत देशातील विविध राज्यांत हिंदू, बौद्ध, जैन, शीख व अन्य धर्मीयांची पवित्र व ऐतिहासिक स्थळे आहेत. मात्र महागाई तसेच धावपळीच्या जीवनात गणेशभक्ताना या स्थळांना भेट देणे खिशाला परवडणारे नसते. त्यामुळे मंडळाने आतापर्यंत शनिवारवाडा, डिजनीलँड, वाराणसी, बुद्धकालीन अजिंठा-वेरूळ लेणी, मथुरा, राम मंदिर प्रतिकृती, हनुमान बजरंग बली, म्हैसूर पॅलेस, शिर्डी संस्थान असे देखावे उभारले होते. सह्याद्री क्रीडा मंडळाने गेल्या ४८ वर्षांपासून गणेशोत्सवानिमित्त एकापेक्षा एक सरस प्रतिदेखावे उभारले आहेत. ४९व्या वर्षानिमित्त कलाकार राहुल परब यांनी यंदाची कलाकृती साकारली आहे. ही गजराज कलाकृती पाहण्यासाठी गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष राहुल वाळंज, सचिव अमित सातार्डेकर यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

