कर्जबाजारी झाल्याने टाकलेल्या डाव ''तोच'' फसला

कर्जबाजारी झाल्याने टाकलेल्या डाव ''तोच'' फसला

Published on

कर्जबाजारी झाल्याने टाकलेल्या डावात ‘तोच’ फसला
पंकज रोडेकर
डोक्यावरील कर्जाचे डोंगर हटवण्यासाठी जबरी चोरीचा मास्टर प्लॅन आखला. घरात शिरून चोरी करण्याचा प्रयत्न करत असतानाच त्याच्या हातून खूनाचा गुन्हा घडला. तरीही तो पळून जाण्यात यशस्वी झाला. परंतु, एका चुकीने पोलिसांच्या जाळ्यात सापडला.
गणेशोत्सव तोंडावर आले होते. डोक्यावर कर्जाचे डोंगर झाल्याने उघडलेल्या कपड्यांच्या दुकानात नवीन माल भरण्यासाठी पैसे नव्हते. याचदरम्यान ओळख झालेल्या दोन वयोवृद्ध (मायलेकी) महिलांच्या फार्महाऊसवर कोणी पुरुष मंडळी नाही. यातूनच त्या घरात जबरी चोरीचा प्लॅन तयार करून त्याने घरात शिरकाव केला. पण, त्याचवेळी एका महिलेचा हातून खून झाला. तर दुसऱ्या महिलेला गंभीर जखमी केले. त्यानंतर सोन्याचा ऐवज घेऊन पळ काढण्यात तो यशस्वी झाला. परंतु, कायद्याच्या कचाट्यातून कोणीही वाचू शकत नाही. यानुसार गुन्हा दाखल होताच, ठाणे ग्रामीण पोलिसांनी शिवाजी धसाडे याचा डाव अवघ्या चोवीस तासातच उधळला आणि त्याला बेड्या घातल्या. सध्या तो कारागृहात असून त्याच्याकडील सोन्याचे दागिने हस्तगत केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
शहापूर तालुक्यातील किन्हवली पोलिस ठाण्याच्या हद्दीत मौजे गांडुळवाड हे गाव आहे. तेथील फार्म हाऊसमध्ये १८ ते १९ ऑगस्ट दरम्यान अनोळखी इसमाने त्यांच्या घरात प्रवेश केला आणि चोरीचा प्रयत्न केला. याला विरोध केला असता वीणा हरपलानी (वय ७५) यांचा गळा आवळून जीवे मारले. याचदरम्यान वीणा यांच्या ९७ वर्षीय मातोश्री लक्ष्मी दलवाणी यांच्यावरही शिवाजी याने काठीने डोक्यात प्रहार करून गंभीर जखमी केले आणि वीणा यांच्या गळ्यातील चेन, हातातील सोन्याच्या बांगड्या याशिवाय कपाटातील दागिने असा सहा ते सात लाखांचा ऐवज घेऊन तो पळून गेला. ही घटना वाऱ्यासारखी पसरल्याने शहापूर तालुक्यात एकच खळबळ उडाली होती.
किन्हवली पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर ठाणे ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी त्या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत, तातडीने शहापूर उपविभागीय पोलिस अधिकारी मिलिंद शिंदे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश मनोरे यांच्या पथकांना समांतर तपासाचे आदेश दिले. फार्महाऊसच्या बाजूलाच एका ठिकाणी तारांच्या कुंपणाचे काम सुरू होते. त्याठिकाणी चौकशी केली असता शिवाजी धसाडे यांची त्या दोघींशी दहा दिवसांत जवळीक निर्माण झाली होती. त्यातून तो तेथे जात असल्याची माहिती समजली. तांत्रिक तपासातही संशयाची सुई त्याच्याकडे इशारा करत असल्याने शिवाजी धसाडेंना ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. यादरम्यान, चोरी केलेले दागिने शिवाजी यांनी एका कंपनीत गहाण ठेवत चार लाख रुपये घेतले होते. हा चोरीचा ऐवज हस्तगत केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com