कल्याण विठ्ठलवाडी गणेशोत्सवातुन एसटीच्या प्रवासाचा देखावा

कल्याण विठ्ठलवाडी गणेशोत्सवातुन एसटीच्या प्रवासाचा देखावा

Published on

कल्याण विठ्ठलवाडी गणेशोत्सवातून एसटीच्या प्रवासाचा देखावा
कल्याण, ता. ३१ (बातमीदार) : गणेशोत्सवात काही मंडळांनी एसटी बसचे प्रतिकात्मक देखावे गणपतीसमोर साकारले आहेत. कल्याण, विठ्ठलवाडी आगाराच्या माध्यमातून यंदा एसटी बसच्या मॉडेल्ससह १९४८ ते २०२५ पर्यंतचा एसटीचा माहितीपूर्ण प्रवास घडवला आहे. दोन्ही आगारांनी संयुक्तपणे आयोजित केलेला गणेशोत्सव प्रवाशांसह शहरवासीयांचे लक्ष वेधून घेत आहे.
नव्यानेच रस्त्यावर उतरलेल्या बीएस-६ एसटीच्या प्रतिकृती मॉडेलमध्ये बाप्पा विराजमान झाले असून समोर लालपरी, एशियाड, वारी, शिवनेरी, शिवाई, हिरकणी असे आतापर्यंतचे २० मॉडेल्सचे प्रदर्शन करण्यात आले आहे. त्याचबरोबर वाहननामा व एसटीनामाच्या माध्यमातून माहिती फलक लावले असून आजवरचा इतिहास दाखविण्याला आहे. गणेशोत्सव काळात एसटी कर्मचारी संपूर्णपणे व्यस्त असले तरीही कामाव्यतिरिक्त वेळ काढून दोन्ही आगारातील सर्व कर्मचाऱ्यांनी एकजूट दाखवून गणेशोत्सव साजरा केला असून मंगळवारी (ता. २) बाप्पा निरोप घेणार आहे.
विठ्ठलवाडी एसटी आगाराचे सेवानिवृत्त कर्मचारी टी. ए. जाधव यांनी हे हुबेहूब असे छोटे मॉडेल्स साकारले असून, निवृत्तीनंतर त्यांनी छोटे मॉडेल्स बनविण्याचा उपक्रम सुरू केला आहे. अलिकडील काळात एसटी प्रगतीपथावर असून सण उत्सवात एसटीला प्रथम प्राधान्य दिले जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी महिला सन्मान योजना, अमृत योजना लागू केल्यापासून प्रवासी संख्या कमालीची वाढली असून एसटी भरभराटीच्या वाटेवर असल्याच्या भावना यावेळी गणेशोत्सव मंडळाचे सचिव योगेंद्र कदम यांनी व्यक्त केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com