कामाठीपुराच्या पुनर्विकासाला तारीख पे तारीख!
कामाठीपुराच्या पुनर्विकासाला तारीख पे तारीख!
विकसकांच्या अल्प प्रतिसादामुळे निविदा प्रक्रियेला तिसऱ्यांदा मुदतवाढ
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : वर्षानुवर्षे रखडलेला कामाठीपुराचा पुनर्विकास मार्गी लागावा, यासाठी म्हाडाकडून विशेष प्रयत्न सुरू असले तरी विकसकांकडून अल्प प्रतिसाद मिळत असल्याने तारीख पे तारीख असेच चित्र आहे. बांधकाम आणि विकास संस्थेची नियुक्ती करून हा पुनर्विकास मार्गी लावला जाणार आहे; मात्र विकसकच पुढे येत नसल्याने विकसक नियुक्तीच्या प्रक्रियेला तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्याची नामुष्की म्हाडावर ओढवली आहे. नव्या मुदतवाढीनुसार ११ सप्टेंबरपर्यंत निविदा सादर करता येणार आहेत.
कामाठीपुरा हा सुमारे ३४ एकर जागेवर वसला असून तेथे ९४३ जुन्या मोडकळीस आलेल्या इमारती आहेत. त्यामुळे म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ या इमारतींचा खासगी विकसकाच्या माध्यमातून करण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार रहिवाशांना- भाडेकरूंना ५०० चौरस फुटाची सदनिका दिली जाणार असून ८०० जागा मालकाला प्रति ५० चौरस मीटर जागेसाठी ५०० चौरस फुटाची एक सदनिका मिळणार आहे. त्या पार्श्वभूमीवर म्हाडाने बांधकाम आणि विकास संस्थेची नियुक्ती करण्यासाठी १३ मे रोजी निविदा प्रसिद्ध केली होती. त्यानुसार २८ जुलैपर्यंत ऑनलाइन निविदा भरण्याची मुदत होती; मात्र अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने निविदा भरण्यासाठीची मुदत २६ ऑगस्टपर्यंत वाढवली होती; मात्र त्यालाही प्रतिसाद न मिळाल्याने म्हाडाने आता तिसऱ्यांदा निविदा भरण्यास मुदतवाढ दिली आहे.
निविदापूर्व बैठकीला दोन कंपन्यांची हजेरी
कामाठीपुरा पुनर्विकासासाठी विकसकाची नियुक्ती करण्यासाठी काढलेल्या निविदापूर्व बैठकीला निविदा रेमंड रियल्टी, अशदान प्रॉपर्टीज लिमिटेड या बांधकाम व्यवसायातील नामांकित कंपन्यांच्या प्रतिनिधींनी हजेरी लावत प्रकल्पाच्या तांत्रिक बाबी जाणून घेतल्या होत्या; मात्र म्हाडाला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने मुदतवाढ दिली असल्याची माहिती म्हाडाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.