प्रेम सागर अल्प परिचय

प्रेम सागर अल्प परिचय

Published on

प्रेम सागर अल्प परिचय

परंपरा पुढे नेणारा सुपुत्र

प्रेम सागर हे छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरलेल्या ‘रामायण’ या मेगामालिकेचे दिग्दर्शक रामानंद सागर यांचे सुपुत्र. एफटीआयआय पुणे (१९६८ बॅच) येथून शिक्षण घेतलेल्या प्रेम सागर यांनी सिनेमॅटोग्राफीमध्ये भक्कम पाया रचला. वडिलांच्या पावलावर पाऊल टाकीत तेदेखील या क्षेत्रामध्ये आले आणि त्यांनी आपले एक विश्व निर्माण केले. ‘रामायण’, ‘विक्रम और बेताल’, ‘श्रीकृष्ण’ ‘अलिफ लैला’ यांसारख्या दूरदर्शनवरील गाजलेल्या मालिकांमागे त्यांचा मोलाचा वाटा होता. रामायण मालिकेतील अनेक स्पेशल इफेक्ट हे त्यांच्या कल्पनेतून साकारले गेले. ते अजूनही लोकांच्या स्मरणात राहिले आहेत. अनेकांना माहिती नसेल मात्र ‘विक्रम और बेताल’ ही प्रेम सागर यांच्या कल्पनेतून साकारलेली दूरचित्रवाणी मालिका होती. या मालिकेला दूरदर्शनने दुपारची वेळ दिली होती; मात्र मालिका एवढी लोकप्रिय ठरली, की दूरदर्शन व्यवस्थापनाला वेळ बदलून प्राइम टाइम द्यावा लागला. वडील रामानंद सागर यांच्या सर्जनशील परंपरेला त्यांनी निष्ठेने पुढे नेले. चित्रपट क्षेत्रातही त्यांनी आपली छाप सोडली. ‘ललकार’, ‘आँखे’, ‘चरस’ यांसारख्या चित्रपटांत ते सिनेमॅटोग्राफर म्हणून कार्यरत होते. तसेच जितेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘हम तेरे आशिक हैं’ या चित्रपटाचे दिग्दर्शन व निर्मिती त्यांनी केली होती. प्रेम सागर हे मितभाषी, समर्पित आणि बारकाईने काम करणारे तसेच शांत स्वभावाचे व्यक्तिमत्त्व होते. रामायण प्रत्यक्ष उतरवण्यासाठी लागणारे भागभांडवल गोळा करण्यासाठी वडिलांच्या सांगण्यावरून त्यांनी जगभर प्रवास केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com