सदनिकाधारकांची फसवणूक करणाऱ्या विकसकाला अटक

सदनिकाधारकांची फसवणूक करणाऱ्या विकसकाला अटक
Published on

सदनिकाधारकांची फसवणूक करणाऱ्या विकसकाला अटक
भाईंदर, ता. ३१ (बातमीदार) : बनावट बांधकाम परवानग्यांचा वापर करून सदनिकेची विक्री केल्याबद्दल मीरा भाईंदर वसई विरार पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने विकसक उमरावसिंह ओस्तवालला शनिवारी (ता. ३०) अटक केली आहे. ओस्तवालवर मीरा रोड येथील ओस्तवाल पॅराडाईज इमारतीत मंजूर केलेल्या मजल्यांपेक्षा जास्त मजले बांधून त्यांची विक्री केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी इमारतीमधील रहिवाशांनी नवघर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. ओस्तवालने बनावट कागदपत्रे वापरून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली. पोलिसांनी तपास सुरू करताच ओस्तवाल फरार झाला होता; मात्र तांत्रिक तपासानंतर गुन्हे प्रकटीकरण कक्ष १ चे प्रभारी पोलिस निरीक्षक सुशीलकुमार शिंदे यांनी त्याला पळून जात असताना पकडले. पोलिस तपासात ओस्तवालविरोधात नवघर, मिरारोड, नयानगर आणि काशीमिरा पोलिस ठाण्यांमध्ये एकूण १३ गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com