गोपाळनगर गणेशोत्सव मंडळ

गोपाळनगर गणेशोत्सव मंडळ

Published on

भव्यदिव्यपेक्षा गोपाळनगर मंडळ जपते समाजसेवेची परंपरा
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १ ः गोपाळनगर उत्साही युवक मंडळाने सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यासोबतच सामाजिक भान जोपासले आहे. भव्यदिव्य या संकल्पनेपेक्षा सामाजिक या ध्येयाने प्रेरित होऊन मंडळाने नागरिकांना एकत्र आणत विविध उपक्रम राबवले आहेत.
गणेशोत्सव हा केवळ सांस्कृतिक सोहळा न ठरता, समाज जागृतीचे माध्यम ठरावे यासाठी मंडळ सातत्याने प्रयत्नशील आहे. ५३ वर्षांपासून डोंबिवली पूर्वेतील गोपाळनगर उत्साही गणेशोत्सव मंडळ कार्यरत आहे. गेल्या १० वर्षांपासून कोरोना काळ वगळता खोणी गावातील अमेय पालक संघटना संचालित घरकुल या संस्थेतील गतिमंद मित्र व मैत्रिणींना दरवर्षी गणेशोत्सवाच्या निमित्ताने डोंबिवली परिसरातील गणपतींचे दर्शन मंडळ घडविते. गोपाळनगरच्या मंडळात या विशेष विद्यार्थ्यांच्या हस्ते श्री गणेशाची आरतीदेखील केली जाते. दिवाळीतदेखील या विद्यार्थ्यांसोबत साजरी करून फराळाचा आनंद लुटला जातो. आदिवासी पाड्यावर तेथील बांधवांसोबत दिवाळी साजरी करणे, सण उत्सवासोबतच लातूर किल्लारी येथील भूकंपग्रस्तांना प्रत्यक्ष जाऊन कपडे, अन्नधान्याची मदत, भांडी व जीवनापयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.
भामरागड येथील प्रकाश आमटे यांच्या लोक बिरादरी प्रकल्पास, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण संचालित जव्हार मोखाडा येथील वैद्यकीय प्रकल्पास, कारगिल युद्धातील शहीद जवानांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत केली गेली. चिपळूण येथील पुरग्रस्तांना स्वच्छता किटचे वाटप यांसह विविध प्रकारचे समाजोपयोगी उपक्रम मंडळाने आतापर्यंत राबविले आहेत.
यावर्षी मंडळाने ‘आपला बाप्पा आपण घडवू या’ हा उपक्रम राबवून मुलांना पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्यास प्रोत्साहित केले. या उपकमाला मोठा प्रतिसाद लाभला असून, समाजात पर्यावरण संवर्धनाबदल जागरूकता निर्माण झाली.
मंडळाचे अध्यक्ष प्रतीक देशपांडे, उपाध्यक्ष राजेश कनोजिया, सचिव प्रवीण पुजारे, इशान तांडेल, हार्दिक चौधरी, वैभव आहिर, ज्योती झावरे यांसह श्रींचे इतर सेवेकरी मंडळात सक्रिय आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com