पारंपरिक गौरी पूजनात महिलांचा उत्साह
पारंपरिक गौरी पूजनात महिलांचा उत्साह
पोलादपूर, ता. २ (बातमीदार) ः गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गौरी आगमन हा कोकणातील एक महत्त्वाचा पारंपरिक सोहळा मानला जातो. कोकणातील महाड आणि पोलादपूर परिसरातही यावर्षी हा सोहळा उत्साहात पार पडला. महिलांनी पारंपरिक पद्धतीने गौरीचे पूजन करून नैवेद्य अर्पण केले. गावोगावी महिला वर्गाचा उत्साह शिगेला पोहोचला होता. दिवसभर पूजेनंतर रात्री महिलांनी मंगळागौर सादर करून जागरण केले. ठिकठिकाणी पारंपरिक गाणी, नृत्य आणि भजन-कीर्तनाने वातावरण भारून गेले.
महाड आणि पोलादपूर परिसरात मिळून यंदा एकूण २, ३३१ गौरींचे आगमन व पूजन झाले. यामध्ये महाड शहरात १, ३६१, महाड तालुक्यात २१०, औद्योगिक वसाहतीत २३०, तर पोलादपूर तालुक्यात ५३० गौरींचे पूजन पार पडले. महिलांनी पारंपरिक परिधान करून पूजा केली. अनेक ठिकाणी महिलांनी गाणी म्हणत, ववसा साजरा करत रात्रीचा आनंद लुटला. कोकणातील या सोहळ्यात ‘ओवसा’ भरण्याची प्रथा विशेष महत्त्वाची मानली जाते. ओवसा म्हणजे नववधूला सासरी मानाचा पहिला ओवाळा देणे. लग्नानंतरच्या ज्यावर्षी गौरी पूर्वा नक्षत्रात येतात, त्या वर्षी नववधूचा पहिला ओवसा करण्याची परंपरा आहे. यंदा गौरी पूर्वा नक्षत्रात आल्याने कोकणभर नववधूंच्या पहिल्या ओवसाचा आनंद अनुभवायला मिळाला. यानिमित्ताने अनेक माहेरवाशीण गावी आल्या आणि पारंपरिक विधी पार पाडले. ओवसा म्हणजे फक्त एक विधी नाही, तर नववधूचा सासरच्या कुळात अधिकृत प्रवेश मानला जातो. यामागचा हेतू म्हणजे नव्या सुनेला मान-सन्मान मिळावा आणि तिला घरातली थोरामोठ्यांची ओळख व्हावी हा आहे. या वेळी गौराईच्या ओटी भरून तिच्या आशीर्वादाने नव्या सुनेस सामर्थ्य आणि ऐश्वर्य लाभावे अशी प्रार्थना केली जाते. सुप देणे हे ऐश्वर्य आणि मंगलाचे प्रतीक मानले जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.