इच्छापूर्ती गणेश म्हणून ख्याती
इच्छापूर्ती गणेश म्हणून ख्याती
रवींद्र समेळ कुटुंबीयांची १२५ वर्षांच्या गणरायाची परंपरा कायम
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २ : गणेश चतुर्थीला मोठ्या उत्साहात व आनंददायी वातावरणात गणरायाचे आगमन सार्वजनिक मंडपात आणि घरोघरी झाले. ठाण्यातील घोडबंदर भागातील समेळ कुटुंबीयांनी आपल्या १२५ वर्षांची परंपरा कायम ठेवत मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला. यात बालगणेशाचं गोंडस रूप सोन्याच्या दागिन्यांनी सजवण्याची विशेष परंपरा आहे, तर या गणेशाची इच्छापूर्ती अशी ख्याती असून, अनेक सिनेकलाकारदेखील गणरायाच्या दर्शनासाठी आवर्जून हजेरी लावतात.
गणपती एकच असला, तरी त्याचं रूप, त्याच्या स्वागताचा थाट आणि सजावट प्रत्येक घराघरात वेगवेगळ्या रूपात अनुभवायला मिळते. राज्यभरात सार्वजनिक गणेशोत्सवासह घरगुती गणेशाचेदेखील मोठ्या उत्साहात ढोल-ताशांच्या गजरात आगमन झाले आहे, तर घरगुती गणपतींमध्ये मानाचा गणपती म्हणून समेळ परिवाराचा गणपती ओळखला जातो. या गणपतीचे वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती मातीपासून घडविण्यात येते. बालगणेशाचं गोंडस रूप यात साकारले जात असून, सोन्याच्या दागिन्यांनी सजवण्याचीदेखील विशेष परंपरा आहे. मूर्तीचे आगमन असो वा विसर्जन दोन्ही प्रसंग मोठ्या थाटामाटात साजरे केले जातात.
दर्शनाला सिनेकलाकारांची हजेरी
दरम्यान, या गणेशाची इच्छापूर्ती गणपती म्हणून ख्याती आहे. विशेष म्हणजे, दरवर्षी ही मूर्ती एकाच स्वरूपात घडवली जाते, मूर्तिकार पालेकर यांच्या समवेत रवींद्र समेळ स्वतः रंगभूषाकार असल्याने जातीने लक्ष देत, मूर्ती घडवतात. नामवंत सिनेकलाकार या मूर्तीच्या दर्शनाला येतात. गणेश चतुर्थीचा हा सोहळा मोठ्या भक्तिभावाने आणि प्रेमाने समेळ कुटुंबीय साजरा करत असतात, अशी माहिती रेवा समेळ यांनी दिली.
परंपरेचा अमूल्य वारसा
१९०० पासून ही परंपरा अलिबागमधील चौल येथे समाजसेवक रामचंद्र समेळ यांनी सुरू केली. आज या उत्सवाला १२५ वर्षे झाली आहेत. रवींद्र समेळ यांच्या आजोबांपासून सुरू झालेली ही परंपरा आजही त्याच श्रद्धेने आणि भक्तिभावाने चालू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.