"अवयवदान" या देखाव्याने वेधले गणेशभक्तांचे लक्ष..*
मरणात खरोखर जग जगते
अवयवदान या देखाव्याने वेधले गणेशभक्तांचे लक्ष
ठाणे, ता. २ (बातमीदार) : दान करण्यासाठी मोठा पैसा अडका संपत्ती असायला पाहिजे असं नाही. ईश्वराने निर्माण केलेला हा देह आपला स्वतःचा असतो. कोणतेही दान सर्वश्रेष्ठ असते. आपले नेत्र, किडनी, लिव्हर, हृदय, यकृत याही अवयवांचे दान केले जाऊ शकते. आज समाजामध्ये कितीतरी रुग्ण किडनी, यकृत, हृदयाच्या प्रतीक्षेत त्यांना जर या अवयवांचे लाभ झाला तर अजून जीवन जगू शकू. अवयव दान या महत्वपूर्ण विषयावर कोलबाड मित्र मंडळानी देखावा तयार केला असून शॉर्ट फिल्मद्वारे जनजागृतीपर माहितीही दिली आहे.
शिवसेना ठाणे जिल्हा शाखा जिल्हा स्तरावरील श्री गणेश दर्शन स्पर्धा २०२५ मध्ये ठाण्यातील कोलबाड मित्र मंडळाने दहावा स्थान पटकावले आहे. कोलबाडचा राजाने यंदा अवयवदान हा विशेष देखावा साकारला आहे. अध्यक्ष योगेश जावळे, उपाध्यक्ष सचिन गुप्ता, सेक्रेटरी कौस्तुभ चव्हाण, उपसेक्रेटरी अनुज तिडके, खजिनदार ऋषीकेश निवाते, उपकाजिमदार अक्षय कुलकर्णी, प्रमुख सल्लागार राजु मोरे, अमर राजभर, विनय राजभर, शशिकांत कदम असून कार्यकारणी सदस्य वैभव मुळीक, ओमकार मोरे, विनोद मगर, श्लोक सिंग, रोहित बादन, ओमकार तांबटकर, अस्मित देशमुख, आर्बन तांबटकर, मंगेश जाधव, निलेश गुप्ता, संतोष सोनार,अजय सत्रे, अतुल मोरे, आदी यांच्यासह लहान मुलांनी देखावा साकारण्यात मोलाचे योगदान दिले आहे.
मानवी कल्याणासाठी देहाचा उपयोग
मृत्यूनंतर आपल्या शवाची केवळ राख किंवा माती होण्यापेक्षा मानवी कल्याणासाठी त्या देहाचा उपयोग व्हावा अशी विचारधारा आज समाजावर रुजवण्याची गरज आहे. आपले गणराय गजमुख आहेत. हत्तीच्या डोक्याचे प्रत्यारोपण केल्यामुळे बाल गणेशाचा पुनर्जन्म झाला, अन् गजानन झाला. मरणानंतरही हा देह अक्षय अविनाशी होण्यासाठी आम्ही आजच अवयव दान व देहदानाचे आवाहन करत आहोत.
पर्यावरणपूरक आरास
या सर्व आरसाला साकारण्यासाठी १५ ते २० दिवस लागले असून ही संकल्पना अजय सत्रे यांची आहे. यंदाची मूर्ती शाडू मातीची असून ती कळव्यातील मूर्तिकार दिपक गोरे यांनी बनवली आहे. यंदा देखावा साकारण्यासाठी लाकूड, पेपर आणि स्टेयरो फोमचा उपयोग केला असल्याचे कोलबाड मित्र मंडळाचे प्रमुख सल्लागार राजु मोरे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.