सुरक्षेचे नियम डावलून पंपांवर भरले जातेय इंधन
ठाण्यात इंधन भरणे धोकादायक
सुरक्षेचे नियम डावलून पंपांवर भरले जातेय इंधन
ठाणे शहर, ता. २ (बातमीदार) ः ठाण्यातील पंपावर पेट्रोल भरणे धोकादायक झाले आहे. पेट्रोल भरताना वाहन चालक आणि पंप धारकांकडून सर्रासपणे सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. वाहनांच्या तुलनेत पंपाची जागा कमी पडत असून पंपांच्या भोवतालच्या नागरी वसाहती, बाजारपेठा आणि दुकानदारांची गर्दी पाहता हा धोका अधिक पटीने वाढला असल्याचे दिसते. डिझेल आणि पेट्रोल विक्रीसाठी मंजुरी मिळालेली असताना आता येथे सीएनजी सारख्या ज्वलनशील इंधनाची देखील विक्री होऊ लागली आहे. त्यामुळे इंधन भरण्याकरिता पंपाची मूळ जागा कमी पडू लागली आहे. परिणामी असे ठिकाणे धोकादायक झाली असून ती सुरक्षित ठिकाणी हलवली जावीत, अशी मागणी दक्ष नागरिकांकडून होऊ लागली आहे.
ठाणे शहरातून जाणाऱ्या लाल बहादूर शास्त्री (आग्रा रोड) मार्गालगत अनेक पेट्रोल पंप अस्तित्वात आहेत. या पंपांना डिझेल आणि पेट्रोल विक्री करण्याची परवानगी मिळालेली आहे. परंतु, आता त्या ठिकाणी सीएनजी इंधनाची देखील विक्री होऊ लागली आहे. वाढत्या वाहन संख्येमुळे इंधन भरण्याची जागा अपुरी पडत असून पंप धारकांकडून सुरक्षाच्या नियमांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसते. पंपावर वाहनात इंधन भरण्याचे काम सुरू असतानाच बाजूलाच टँकरमधून हजारो लिटर इंधन पंपातील टाक्यांमध्ये उतरवले जात असते. इंधन भरताना वाहन चालकांकडून वाहन बंद करणे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असतानाही ते चालू असतानाच पंपावरील कर्मचाऱ्यांकडून इंधन भरले जाते. अशावेळी दुर्दैवाने वाहनांमध्ये स्पार्क झाला तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. इंधन भरले जात असताना वाहनामधून खाली उतरणे बंधनकारक असतानाही वाहन चालकांकडून सर्रासपणे या नियमांचे उल्लंघन होताना दिसते आहे. इंधन भरण्यासाठी लागलेली रांग लवकर कमी करता यावे याकरिता पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांकडूनही या नियमांकडे दुर्लक्ष केले जाते.
सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष होत असलेले पेट्रोल पंप :
ठाणे एलबीएस मार्गावरील तीन पेट्रोल पंप, खोपट एलबीएस मार्गालगतचा पंप, खोपट एसटी आगारा जवळचा सीएनजी पंप, कापूरबावडी नाका जवळचा पंप, माझी वडा नाका पंप, घोडबंदर वडवली चौकाजवळचा पंप
याकडे केले जातेय दुर्लक्ष :
दुचाकीवर बसून इंधन भरले जाते, वाहनांच्या रांगेकरता बॅरिगेट्स लावले जातात, वाहनांच्या रांगेजवळच टँकरमधून इंधन खाली केले जाते, रांगेतले वाहनधारक अनेकदा मोबाईलवर बोलत असतात, इंधन भरताना दुचाकीवर लहान मुले बसलेले दिसतात, काही पंपांवर जागे अभावी नागरिकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध नाहीत.
फोटो : ठाण्यातील पंपावर अशाप्रकारे धोकादायक पद्धतीने इंधन भरले जाते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.