लोटस तलावाचा पाणथळात समावेश असल्याचे स्पष्ट

लोटस तलावाचा पाणथळात समावेश असल्याचे स्पष्ट

Published on

लोटस तलावाचा पाणथळात समावेश असल्याचे स्पष्ट
तुर्भे, ता. २ (बातमीदार) ः पाणथळ जागांच्या अधिसूचनेच्या पूर्वसूचनेचा भाग म्हणून, नेरूळमधील लोटस लेक पाणथळ जागेचे भू-सत्य तपासण्याचे काम राष्ट्रीय शाश्वत तटीय व्यवस्थापन केंद्राने (एनसीएससीएम) पूर्ण केले आहे, अशी माहिती राज्य सरकारने आरटीआय कायदाअंतर्गत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात नॅट कनेक्टचे संचालक बी. एन. कुमार यांना दिली आहे. लोटस लेक हा पाणथळ नसल्याचा सिडकोचा दावा लक्षात घेता, ही माहिती महत्त्वाचे असल्याचे कुमार यांनी सांगितले.
राज्यातील इतर जलसंचयासह पाणथळ जागेचे ‘संक्षिप्त दस्तऐवजीकरण’ करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि एनसीएससीएम अहवालाची वाट पाहत असल्याची ‘माहिती अधिकार’ कायद्यांतर्गत नॅट कनेक्टच्या प्रश्नाच्या उत्तरात राज्य पर्यावरण विभागाने माहिती दिली आहे. राज्यातील पाणथळ जागांचे मॅपिंग आणि दस्तऐवजीकरणाचे काम एनसीएससीएमने केले आहे. त्यामुळे पाणथळ जागेची अधिसूचना देण्याची स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न कुमार यांनी केला. सिडकोने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळमधील डेब्रिज पाणथळ जागेत टाकल्याबद्दल पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली.
कुमार यांनी, केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय, मुख्यमंत्री आणि राज्य पर्यावरण मंत्रालयाकडे लैंडफिलबद्दल तक्रार केली. ठाणे जिल्हा जिल्हाधिकारी आणि सिडकोकडून तलावाच्या स्थितीबद्दल अहवाल मागितल्याचे सांगितले. तसेच लोटस तलावाचा अहवाल जिल्हा पाणथळ जागा समितीला पाठवण्यात येईल, असे पर्यावरण विभागाचे सार्वजनिक माहिती अधिकारी आणि शास्त्रज्ञ नीलेश पोतेदार यांनी स्वाक्षरी केलेल्या उत्तरात म्हटले आहे.
...........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com