अशोक नगर, शिवाजी नगर प्रभागाच्या चुकीच्या विभागणीबाबत आरपीआयची हरकत
नगर प्रभागाच्या चुकीच्या विभागणीबाबत आरपीआयची हरकत
कल्याण, ता. २ (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रभागरचना पॅनेल प्रणालीतील अशोक नगर व शिवाजी नगर प्रभागाच्या चुकीच्या विभागणीबाबत आरपीआयने हरकत घेतली आहे. अशोक नगर व शिवाजी नगर हे प्रभाग कल्याण पूर्व पॅनेलमध्येच समाविष्ट करण्यात यावेत. पश्चिमेकडील प्रभागाशी जोडण्यांचा निर्णय तातडीने मागे घेण्यात यावा. याबाबत स्थानिक नागरिक, सामाजिक संस्था व संघटनांचा थेट सहभाग व सल्लामसलत घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
आगामी महापालिका निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या प्रभागरचनेत प्रभागाची नैसर्गिक व भौगोलिक विभागणी मोडीत काढली. अशोक नगर व शिवाजी नगर हे ऐतिहासिकदृष्ट्या कल्याण पूर्व भागाशी जोडलेले आहेत. नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील सर्व सुविधा, बाजारपेठ, शाळा, शासकीय कार्यालये, रेल्वेस्थानक यांचा उपयोग हा पूर्णपणे कल्याण पूर्वकडे केंद्रित आहे. तरीसुध्दा सध्याच्या पॅनल रचनेत या दोन्ही प्रभागांना राजकीय हेतूने कल्याण पश्चिमेकडे जोडण्यात आले आहे. हे पूर्णपणे अव्यवहार्य आणि अन्यायकारक आहे.
स्थानिक उमेदवारांना नागरिकांचे प्रश्न व समस्या माहिती असतात, परंतु कल्याण पश्चिम भागाशी जोडल्यास स्थानिकांचे मताधिकार व प्रतिनिधित्व दिशाभूल होऊन कमकुवत होईल. अशोक नगर व शिवाजी नगर येथील नागरिकांची बहुतेक कामे कल्याण पूर्वमधील शासकीय कार्यालयांशी निगडित आहेत. जर हे प्रभाग पश्चिममध्ये जोडले गेले, तर नागरिकांना अनावश्यक अडचणी व त्रास सहन करावा लागेल. त्यामुळे ही विभागणी न्यायालयीन दृष्टीनेही अनुचित व आक्षेपार्ह ठरू शकते, असे या हरकतीमध्ये नमूद करण्यात आले आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे माजी नगरसेविका मनीषा रणदिवे आणि कल्याण शहर माजी अध्यक्ष राजू रणदिवे, मंगल पाठारे, जितू अहिरे, सचिन चंदने, अमोल पंडित यांनी पालिका आयुक्त आणि राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षांकडे हरकत नोंदवली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.