एकाच मालकाच्या सहा बंद घरात चोरी

एकाच मालकाच्या सहा बंद घरात चोरी

Published on

एकाच मालकाच्या सहा बंद घरात चोरी
चोरी करताना त्या घरांची चोरट्यांनी केली तोडफोड
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता.२ : वागळे इस्टेट परिसरातील हाजुरी येथील गौतम यादव चाळीत चोरट्यांनी एकाच मालकाचे सहा घरात चोरी केली आहे. २० हजार रुपये आणि आधार, पॅन, निवडणूक कार्ड, वाहन परवाना आणि घराच्या कागदपत्रांच्या छायांकित प्रती घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. याचबरोबर चोरट्यांनी घरांची तोडफोड करत लादया उखडल्या, नळाचे पाईप, सिमेंटचे पत्रे, वायरिंग तोडून नुकसान केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. हा प्रकार जुलै महिन्यात घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
तक्रारदार मनोज श्रीराम यादव हे शहापूर येथील वासिंद येथे राहत आहेत. ते व्यवसायाने वकील असून ठाणे आणि मुंबई या ठिकाणी वकिली करतात. त्यांचे वडील दिवंगत श्रीराम यादव हे भारतीय सैन्यामधून १९७५ मध्ये सेवानिवृत्ती झाल्यानंतर त्यावेळी मिळालेल्या पैशातून त्यांनी हाजुरी येथे जमीन विकत घेतली होती. त्या ठिकाणी तळ अधिक एक मजली चाळ पद्धतीचे घर बांधले. त्या चाळीस गौतम यादव नाव देण्यात आले असून २०१७ मध्ये त्या इमारतीच्या पुनर्वसनाचे काम सुरू झाल्यामुळे ते शहापूर येथे राहण्यात गेले. २३ जुलै २०२५ रोजी तक्रारदार हे हाजुरी या ठिकाणी त्यांच्या ताब्यात असलेल्या रूममध्ये रात्री १० वाजेपर्यंत थांबून कुलूप लावून शहापूरला घरी निघून गेले. २४ जुलै रोजी रात्री ९ वाजता पुन्हा ते घरी आले असता, घरांच्या रूमचा दरवाजा तुटलेला आतील बाजूस पडलेला दिसून आला. तसेच छोट्या लाकडी कपाटात ठेवलेले रोख रक्कम व कागदपत्रे दिसून आले नाहीत. शिवाय वरील मजल्यावरील इतर पाच रूमचे ही दरवाजे तोडल्याचे दिसून आले. याप्रकरणी सप्टेंबर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com