विरार फुलपाडा स्मशानभूमीत लाकडाचा तुटवडा
विरार फुलपाडा स्मशानभूमीत लाकडाचा तुटवडा
तीनतास मृतदेह स्मशानात तिष्ठत
विरार ता.(बातमीदार) : विरार पूर्वेकडील फुलपाडा परिसरातील स्मशानभूमीत लाकडाचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्याने स्थानिक नागरिक अडचणीत आले आहेत. रणजीत सदा यांच्या आजोबांचे नुकतेच रुग्णालयात निधन झाल्यानंतर, कुटुंब अंत्यसंस्कारासाठी फुलपाडा स्मशानभूमीत पोहोचले, परंतु तेथे लाकूड उपलब्ध नव्हते. कुटुंब सुमारे तीन तास भटकत राहिले, अखेर त्यांना विरार पश्चिमेहून लाकूड आणावे लागले, ज्यासाठी त्यांना टेम्पो भाडे म्हणून ५०० रुपये द्यावे लागले. पालिकेच्या अशा धोरणाचा नागरिकांना फटका बसत आहे.
स्मशानभूमीचे कर्मचारी संजय सुर्वे म्हणाले की, सुमारे ६० लाख रुपयांचे बिल थकित असल्याने गेल्या १५ दिवसांपासून लाकडाचा पुरवठा बंद आहे. त्यामुळे दररोज अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या कुटुंबियांना खूप त्रास सहन करावा लागत आहे.स्मशानभूमीची अवस्थाही जीर्ण झाली आहे. कार्यालयात पंखाही नाही, भिंतींमधून पावसाचे पाणी गळते आणि सगळीकडे गोंधळाचे वातावरण आहे. कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, पालिका अधिकाऱ्यांना अनेक वेळा पत्रे पाठवण्यात आली होती, परंतु अद्यापपर्यंत कोणताही उपाय सापडलेला नाही.टेम्पो चालक संजय केळकर म्हणाले की, ही समस्या केवळ फुलपाडापुरती मर्यादित नाही, तर मनवेलपाडा गाव, चंदनसार, कोपरी गावातील स्मशानभूमीतही लाकूड उपलब्ध नाही. अलिकडेच संजय केळकर लाकूड घेण्यासाठी त्यांच्या वाहनातून आले होते, परंतु तेथेही त्यांची निराशा झाली.स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, अंत्यसंस्कारांसारख्या संवेदनशील प्रक्रियेत कुटुंबातील सदस्यांनी अशा प्रकारे भटकंती करणे ही अत्यंत लज्जास्पद आणि अमानवी परिस्थिती आहे. वसई-विरार महानगरपालिकेने तातडीने हस्तक्षेप करून स्मशानभूमीत लाकडाचा पुरवठा पूर्ववत करावा आणि मूलभूत सुविधांचा अभाव दूर करावा, जेणेकरून कुटुंबांना दुःखाच्या वेळी पुढील अडचणींना तोंड द्यावे लागू नये.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.