गायक राहुल देशपांडे यांचा घटस्फोट
गायक राहुल देशपांडे यांचा घटस्फोट
मुंबई, ता. २ : मराठी शास्त्रीय गायक आणि गझल-नाटक क्षेत्रातील लोकप्रिय कलाकार राहुल देशपांडे यांनी १७ वर्षांनंतर त्यांच्या पत्नी नेहा देशपांडे यांच्यापासून परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. राहुल यांनी समाजमाध्यमावर पोस्ट करीत ही माहिती चाहत्यांपर्यंत पोहोचवली.
त्यांनी सांगितले की, ‘आपल्या आयुष्यातील या बदलाला वेळ लागला म्हणून मी ही गोष्ट आतापर्यंत उघड केली नव्हती. सप्टेंबर २०२४मध्ये आम्ही कायदेशीररीत्या वेगळे झालो असून, आता स्वतंत्रपणे जीवन जगत आहोत, मात्र आमची मुलगी रेणुकासाठी आम्ही दोघेही जबाबदाऱ्या समानतेने पार पाडणार आहोत.’ नेहाही गायनक्षेत्राशी जोडलेली आहे. राहुल आणि नेहा यांच्या संसाराला १७ वर्षांचा काळ उलटून गेला असून, त्यांनी वेगळे होण्याचा मार्ग निवडला आहे. तरीदेखील दोघेही मुलगी रेणुकाच्या संगोपनासाठी सहपालक म्हणून एकत्र राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. राहुल यांनी त्यांच्या पोस्टमध्ये चाहत्यांकडे समजूतदारपणाची अपेक्षा व्यक्त केली असून, खासगी आयुष्याबाबत आदर ठेवावा, अशी विनंती केली आहे. मराठी संगीतविश्वातील या लोकप्रिय जोडप्याच्या विभक्त होण्याच्या निर्णयाने चाहत्यांना धक्का बसला आहे; मात्र त्याच वेळी मुलीच्या हितासाठी दाखवलेले दोघांचे परिपक्व सहकार्य अनेकांना भावले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.