अनंत चतुर्दशीपर्यंत अवजड वाहतुकीवर बंदी
अनंत चतुर्दशीपर्यंत अवजड वाहतुकीवर बंदी
वाहतूक पोलिसांचा कडक इशारा; मोठ्या वाहनांना प्रवेशबंदी
उल्हासनगर, ता. ३ (वार्ताहर) : गणेशोत्सव काळात शहरातील वाहतूक व्यवस्थेत अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी उल्हासनगर वाहतूक विभागाने कडक पावले उचलली आहेत. आगामी अनंत चतुर्दशीपर्यंत (ता. १७) शहरात मोठ्या वाहनांना पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. ही कारवाई मुख्यतः गणेशमंडळांच्या मूर्ती विसर्जन मिरवणुका, दर्शनासाठी येणारी गर्दी आणि सणाच्या पार्श्वभूमीवर होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन करण्यात येत आहे.
उल्हासनगर वाहतूक विभागाच्या कार्यालयात मंगळवारी (ता. २) घेण्यात आलेल्या विशेष बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीत वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश शिरसाट, तसेच हिराघाट टेम्पो असोसिएशन, सेंट्रल हॉस्पिटल टेम्पो असोसिएशन आणि लिंक रोड टेम्पो असोसिएशनचे पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.
महत्त्वपूर्ण बैठकीत निर्णय घेण्यात आले. शहरात मोठ्या वाहनांना बंदी घालण्यात आली असून, शिरसाट यांनी स्पष्टपणे सांगितले की, अनंत चतुर्दशीपर्यंत शहरातील कोणत्याही मुख्य किंवा अंतर्गत रस्त्यावर मोठी वाहने (लोडिंग-अनलोडिंगसाठी येणारी) फिरू शकणार नाहीत. ही बंदी दिवसा व रात्री दोन्ही वेळेस लागू राहील. कडक तपासणी करण्यात येईल आणि नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही स्पष्ट केले.
पोलिसांच्या उपाययोजना
वाहतूक कोंडी टाळण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात शहरात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी, गणपती मंडप, बाजारपेठांतील खरेदी आणि रस्त्यावर मोकाट उभ्या असलेल्या वाहनांमुळे वाहतूक विस्कळित होते. त्यामुळे वाहतूक विभागाने आधीच नियोजन करून मोठ्या वाहनांचा प्रवेश थांबवणे, स्थानिक टेम्पो असोसिएशन्सना समज देणे, वाहतूक पोलिसांची संख्या वाढवणे, गरजेनुसार पर्यायी मार्ग निश्चित करणे, या उपाययोजना हाती घेतल्या आहेत.
सहकार्याचे आवाहन
वरिष्ठ निरीक्षक शिरसाट यांनी वाहनचालक, टेम्पोचालक आणि व्यापाऱ्यांना शिस्तबद्ध वागणूक ठेवण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, ‘‘गणेशोत्सव हा सर्वांचा सण आहे. वाहतूक सुरळीत राहिली, तर नागरिकांना सणाचा आनंद नीट घेता येईल. त्यामुळे नियम पाळा, सहकार्य करा.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.