हद्दपारीचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

हद्दपारीचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

Published on

हद्दपारीचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी कारवाई
नवी मुंबई, ता. ३ (वार्ताहर) : मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केलेल्या आरोपीला दिघा परिसरातून अटक केली आहे.
सहकाऱ्यासोबत झालेल्या हाणामारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
त्रिभुवन सिंगसह त्याच्या सहकाऱ्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये एमआयडीसी परिसरातील व्यावसायिकांना आरटीआय तसेच पीआयएलच्या माध्यमातून धमकावून खंडणी उकळण्याचे सत्र सुरू केले होते. त्रिभुवन सिंग गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहून तसेच व्यावसायिकांमध्ये निर्माण केलेली दहशत लक्षात घेऊन रबाळे पोलिसांनी जूनमध्ये हद्दपार करण्याबाबतचा प्रस्ताव तयार केला होता. या प्रस्तावाला परिमंडळ–१चे पोलिस उपआयुक्त पंकज डहाणे यांनी मंजुरी दिल्यानंतर तिघांना मुंबई, ठाणे आणि रायगडमधून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले होते, मात्र हद्दपार करून तीन महिने पूर्ण झाले नसताना आरोपी त्रिभुवन सिंग मंगळवारी दिघा यादव नगरमध्ये परतला होता. त्याचा सहकारी अमनसिंगसोबत हाणामारी झाली. त्यानंतर रबाळे एमआयडीसी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्रिभुवनवर महाराष्ट्र पोलिस कायदा कलम १४२ प्रमाणे गुन्हा केला आहे.
़़़़़़़़़़ः-------------------------
परस्परविरोधी गुन्हे
त्रिभुवन सिंग विनापरवानगी दिघा परिसरात आला होता. त्याचा एकेकाळचा सहकारी अमनसिंग याच्यासोबत वाद झाला. त्यानंतर दोघांमध्ये झालेल्या हाणामारीत एकमेकांना हाताबुक्क्यांनी, बांबूच्या साहाय्याने मारहाण केली. या मारहाणीत अमन सिंगचा एक दात पडला आहे, तर त्रिभुवन सिंग याचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. या हाणामारीनंतर रबाळे एमआयडीसी पोलिसांनी दोघांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com