
गौरीसह गणरायांचे विसर्जन उत्साहात
मुरूडमध्ये २,२९२ गणपती, ५२१ गौरींना पारंपरिक निरोप
मुरूड, ता. ३ (बातमीदार) : सोनपावलांनी आलेल्या गौरींसह पाच दिवसांच्या गणरायाच्या उत्सवाची सांगता मंगलमय वातावरणात झाली. ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीसह गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर याच्या गजरात विसर्जन सोहळा पार पडला. मुरूड पोलिस ठाणे हद्दीत यंदा एकूण २,२९२ गणपती आणि ५२१ गौरींचे पारंपरिक रीतिरिवाजाने विसर्जन करण्यात आले.
या सोहळ्यादरम्यान नगर परिषदेच्या वतीने चौकाचौकात रोषणाई करण्यात आली होती. तसेच निर्माल्य संकलनासाठी ठिकठिकाणी कुंभ ठेवण्यात आले होते. पर्यावरणपूरक विसर्जनासाठी नागरिकांना जागृती करण्यात आली. सुरक्षेच्या दृष्टीने १० जीव रक्षक समुद्र किनाऱ्यावर तैनात करण्यात आले होते, तसेच आवश्यक औषधोपचारांची व्यवस्था करण्यात आली होती. मुरूड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली जागोजागी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. विसर्जन मिरवणुकीदरम्यान शिस्त व सुरक्षिततेसाठी पोलिस आणि स्वयंसेवी संस्था कार्यरत होत्या. कोकणवासीयांच्या उत्साहामुळे तालुक्यात भक्तिभावाचे महासागर उसळले होते. मानाच्या गणपती आणि गौरींच्या विसर्जनाने या उत्सवाला विशेष रंगत आणली. गेल्या पाच दिवसांत घराघरात पूजा, आरती, सांस्कृतिक कार्यक्रम आणि गौरी सजावटींनी उत्सवाला आकर्षक रूप दिले. विसर्जन मिरवणुकीत ढोल-ताशांच्या तालावर नृत्य, महिलांच्या ओवाळणी, तसेच आतषबाजीमुळे वातावरणात आनंदाचा वर्षाव झाला. या वेळी बाजारपेठ मित्र मंडळाच्या वतीने भक्तांसाठी शीतपेयांची सोय करण्यात आली होती, ज्यामुळे विसर्जनाला आलेल्या भाविकांना दिलासा मिळाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.