पार्वतीच्या काकांचे वाजतगाजत आगमन

पार्वतीच्या काकांचे वाजतगाजत आगमन

Published on

पार्वतीच्या काकांचे वाजतगाजत आगमन
गौरी-गणपतीनंतर रोहा अष्टमीत गौरा नाचवण्याची परंपरा
रोहा, ता. ३ (बातमीदार) ः रोहा अष्टमीत गौरी-गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी गौरा नाचवण्याची परंपरा आहे. रोहा शहरातील धनगरआळी, अष्टमीतील मराठा आळीत ही परंपरा अखंडितपणे सुरू असून भाविक मोठ्या श्रद्धेने या उत्सवात सहभागी होतात.
रोहा शहरातील ग्रामस्थांनी पिढ्यानपिढ्या गौरा नाचवण्याची पारंपरिक परंपरा जपलेली आहे. गौरा पार्वतीचा काका असल्याची आख्यायिका आहे. गौरी-गणपती विसर्जनानंतर दुसऱ्या दिवशी धनगर आळीचे पाटील वसंत काफरे यांच्या मानाच्या गणपतीच्या ठिकाणी गौरा विराजमान होता. वाजत-गाजत गौरा डोक्यावर नाचवण्याचा मान वखारदार कुटुंबाकडे आहे. नवसाला पावणारा असल्याने अनेक जण केलेला नवस या वेळी फेडतात. त्याच दिवशी शहरातील मानाच्या गणपतीबरोबर गौराचे विसर्जन केले जाते.
------------------------------------------
मानाच्या गणरायासमोर बसण्याचा मान
पेंड्यापासून बनवलेल्या गौऱ्याच्या मूर्तीला कपडे, मुखवटा लावून सजवले जाते. मानाच्या गणरायासमोर त्यांना खुर्चीत बसवून विराजमान केले जाते. विसर्जनावेळी मानकरी वखारदार कुटुंबातील सदस्य संतोष वखारदार गौरा डोक्यावर घेऊन शहरात नाचवतात. यापूर्वी त्यांचे वडील बाळा वखारदार ही प्रथा जोपासत होते. ती परंपरा त्यांच्या मुलांनी सुरू ठेवली आहे. तर अष्टमीतील मराठा आळीत गजानन चव्हाण यांच्या घरी गौरा उत्सव साजरा होतो. यंदा लेझीमचा ठेका धरत निघालेली गौरा महाराजांची मिरवणूक पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com