सोशल मीडियाचा जीवनशैलीवर परिणाम
सोशल मीडियाचा जीवनशैलीवर परिणाम
तरुणांमध्ये आमूलाग्र बदल; अनेक व्यवसाय संधी
कोपरखैरणे, ता. ३ (बातमीदार) : कोपरखैरणे व घणसोली परिसरातील तरुणांची दैनंदिन जीवनशैली आता इन्स्टाग्राम, यूट्युब आणि स्नॅपचॅटसारख्या सोशल मीडियामुळे लक्षणीय बदलत आहे. फॅशन, स्टाइल, फिटनेस, आहार आणि जीवनशैलीसंबंधी नवीन ट्रेंड्स या तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय ठरत आहेत.
स्थानिक तरुण आता फक्त टी-शर्ट, स्नीकर्स शूज किंवा ॲक्सेसरीजसाठीच नव्हे, तर जीवनशैलीतील विविध पैलूंवर लक्ष देत आहेत. इन्स्टाग्रामवरील फॅशन इन्फ्लुएन्सर्स, यूट्युबवरील फिटनेस चॅलेंजेस, हेल्दी फूड रेसिपीज आणि योगा-वर्कआउट टिप्स यामुळे ते प्रेरित होत आहेत. या माध्यमातून ते स्वतःला सध्या लोकप्रिय ट्रेंड्सनुसार व्यक्त करण्याचा प्रयत्न करीत आहेत. स्थानिक व्यावसायिकांनीही या बदलांचा फायदा घेतला आहे. कोपरखैरणे व घणसोलीतील दुकानदारांनी ऑनलाइन तसेच ऑफलाइन दोन्ही माध्यमांतून कपडे, ॲक्सेसरीज, फिटनेस उपकरणे आणि हेल्दी फूड प्रॉडक्ट्स उपलब्ध करून दिले आहेत. काही तरुणांनी तर स्वतः लोकल ब्रँड्स सुरू करून ऑनलाइन व्यवसायदेखील प्रस्थापित केला आहे. स्थानिक तरुणांची मोठी संख्या सोशल मीडियाला फॅशन आणि लाइफस्टाइलचे महत्त्वाचे साधन मानते. त्यातून त्यांना स्वतःला व्यक्त करण्याची संधी मिळते तसेच स्थानिक पातळीवर नव्या फॅशन शैली, स्ट्रीट स्टाइल आणि हेल्दी लाइफस्टाइलचा प्रसार होत आहे. यामुळे केवळ वैयक्तिक जीवनावरच नव्हे, तर स्थानिक व्यवसाय, व्यावसायिक संधी आणि सामाजिक वातावरणावरही परिणाम झाला आहे. सोशल मीडियामुळे तरुण अधिक जागरूक, फिट आणि बुद्धीजीवी बनू लागले आहेत. स्थानिक दुकानदार, फिटनेस कोच आणि फॅशन इन्फ्लुएन्सर्स यांना या बदलाचा लाभ होत आहे. यामुळे समाजातील तरुणाईला आधुनिक जीवनशैली स्वीकारण्यास प्रोत्साहन मिळत आहे.
.............
आरोग्यविषयक जागरूकता
सोशल मीडियाचा प्रभाव फक्त फॅशनपुरताच मर्यादित नाही. तरुण आपल्या फिटनेस आणि आहारातील बदलदेखील या ट्रेंड्सनुसार करीत आहेत. सकाळच्या वेळेस तलाव, उद्यान किंवा सोसायटीत योगा, रनिंग ग्रुप्स आणि जिममध्ये वर्कआउट करणाऱ्या तरुणांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे स्थानिक स्तरावर सदृढ जीवनशैलीचा प्रसार होताना दिसतो. पालकांच्या मते, सोशल मीडियाचा प्रभाव कधी कधी शिक्षणावर किंवा व्यक्तिमत्त्वावर परिणाम करू शकतो. मात्र तरुणांचा दृष्टिकोन वेगळा आहे. ते म्हणतात, सोशल मीडिया फक्त मनोरंजन नाही. त्यातून आम्हाला नवीन ट्रेंड्स, फिटनेस टिप्स, फॅशन आयडियाज आणि प्रेरणा मिळते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.