वाढदिवसानिमित्त तरुणांना हेल्मेट वाटप
वाढदिवसानिमित्त तरुणांना हेल्मेटवाटप
वाडा, ता. ३ (बातमीदार) : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पालघर जिल्हा सहसंपर्कप्रमुख व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नीलेश गंधे यांच्या वाढदिवसानिमित्त वाडा शहरात सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम घेण्यात आले. पठारे मंगल कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात ५४ गरजू महिलांना घरघंट्या, शिलाई मशीन, इस्त्री असे उपयोगी साहित्य वाटण्यात आले. तसेच सुरक्षित प्रवासासाठी ५४ युवकांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाला उपनेत्या ज्योती ठाकरे, ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, माजी आमदार सुनील भुसारा, शिवसेना पालघर जिल्हाप्रमुख अनुप पाटील, अजय ठाकूर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल पाटील, तहसीलदार भाऊसाहेब अंधारे, पोलिस निरीक्षक दत्तात्रय किंद्रे, भाजपचे ज्येष्ठ नेते बाबाजी काठोळे, संदीप पवार, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रकाश केणे, गोविंद पाटील, कांती देशमुख, शिवसेनेचे तालुकाप्रमुख नीलेश पाटील, काँग्रेसचे तालुकाप्रमुख दिलीप पाटील, मनसेचे तालुकाप्रमुख कांती ठाकरे आदींसह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.