गाव विकास आराखड्यांना गती
पालघर, ता. ३ (बातमीदार) : गावांसाठी सरकारकडून येणाऱ्या निधीव्यतिरिक्त विकासकाम व त्यांच्या आराखड्याचे नियोजन करून गाव बळकट करण्याचा मानस सरकारसह प्रशासनाने केला आहे. यासाठी ‘धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियान’ आणि ‘पंतप्रधान जनमन’च्या माध्यमातून गाव विकासाचे आराखडे तयार करण्याचे काम जिल्हा प्रशासनामार्फत सुरू करण्यात आले आहेत. या माध्यमातून जिल्ह्यातील अविकसित गावांना विकासासाठी भरघोस निधी प्राप्त होणार आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील गावे अधिक बळकट होतील, असे जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी सांगितले.
पालघर जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या प्रभावी मोहिमांची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, उपजिल्हाधिकारी रणजीत देसाई आदी उपस्थित होते. गावांना विकासासाठी सरकार वेगवेगळ्या मार्गाने निधी देते, मात्र ज्या गावांमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध नाहीत, अशा सुविधांसाठी पूर्व सर्वेक्षण करून तसा गावकरी आराखडा ग्रामसभेत मंजूर करून तो पुढे पाठवला जाईल. जिल्ह्यात धरती आबा योजनेअंतर्गत ५४ हजार ७७५ लाभार्थ्यांपर्यंत पायाभूत सुविधा पोहोचवण्यात आल्याची माहिती जाखड यांनी दिली.
सरकारच्या दोन्ही उपक्रमअंतर्गत पालघर जिल्ह्यात ६५४ गावांमध्ये तळागाळातील नागरिकांचा ग्राम परिवर्तन गट तयार करण्यात येणार आहे. गावपातळीपर्यंत संपूर्ण शासन या दृष्टिकोनातून हा उपक्रम राबविला जाणार आहे. आदिवासी कल्याण विभाग, ग्राम विकास विभाग, महिला बालकल्याण विभाग, पाणीपुरवठा, शिक्षण, वन विभाग अशा विभागांचे एकत्रीकरण याअंतर्गत करण्यात आले असून, गावांच्या विकासासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे.
अशी होणार अंमलबजावणी
गावातील सुविधा व आवश्यक विकासकामे यासंदर्भात गाव कृती आराखडा तयार करण्याकरिता नऊ अधिकाऱ्यांना जिल्हास्तरीय प्रशिक्षण, तर हे अधिकारी आठ तालुक्यांतील ४० अधिकाऱ्यांना तालुकास्तरीय प्रशिक्षण देतील. तालुकास्तरीय प्रशिक्षण झाल्यानंतर गावात कार्यशाळा आयोजित केल्या जाणार आहेत. या कार्यशाळांमध्ये गावांच्या सुविधांची, विकासकामांची आवश्यकता लक्षात घेऊन त्या अनुषंगाने गावनिहाय कृती आराखडे तयार करून विशेष ग्रामसभेत, तसेच ऑक्टोबरच्या ग्रामसभेत हे आराखडे मंजूर केले जातील. हे आराखडे राज्य सरकारकडे पुढील मंजुरीसाठी पाठवले जातील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.