भिवंडी पालिका प्रभाग रचना जाहीर
भिवंडी, ता. ३ (वार्ताहर) : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे. भिवंडी महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचे प्रारूप जाहीर करण्यात आले आहे. आयुक्तांच्या मान्यतेनंतर सहाय्यक आयुक्त (निवडणूक) नितीन पाटील यांनी बुधवारी (ता. ३) ही रचना प्रसिद्ध केली.
२०११च्या जनगणनेनुसार सात लाख नऊ हजार ६६५ इतकी लोकसंख्या प्रमाण मानून ही रचना आखण्यात आली आहे. २०१७मध्ये लागू असलेली रचना कायम ठेवत यंदाही ९० सदस्यांसाठी २३ प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत. यापैकी २१ प्रभाग हे चार सदस्यीय, तर दोन प्रभाग हे तीन सदस्यीय असतील. प्रभाग रचनेबाबत हरकत किंवा सूचना नोंदवायची असल्यास संबंधितांनी १५ सप्टेंबरला दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज करावा. हरकती नोंदवणाऱ्यांना स्वतंत्रपणे कळविण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.
लोकसंख्येचे प्रमाण
प्रभाग क्रमांक १७ मध्ये सर्वाधिक ३४ हजार ४७४ लोकसंख्या आहे. प्रभाग क्रमांक १५ मध्ये केवळ २५ हजार ९१९ इतकी सर्वांत कमी लोकसंख्या नोंदली गेली आहे. प्रभाग रचनेत तीन सदस्यीय प्रभागासाठी २३ हजार ६५६, तर चारसदस्यीय प्रभागासाठी ३१ हजार ५४१ इतकी सरासरी लोकसंख्या प्रमाण धरली आहे.
अनुसूचित जाती-जमातीची लोकसंख्या
२०११च्या जनगणनेनुसार शहरात अनुसूचित जातीची २१ हजार ८२०, तर अनुसूचित जमातीची आठ हजार १७८ एवढी लोकसंख्या नमूद करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.