जेसवानींचा भाजपमध्ये प्रवेश
उल्हासनगर, ता. ३ (बातमीदार) : महापालिकेची निवडणूक जवळ येते तशी प्रभागांतील माजी नगरसेवकांनी पक्षांतराचा खेळ सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ माजी नगरसेवक सतरादास जेसवानी यांनी आपल्या दोन मुलांसह, तसेच शरद पवार यांचे कट्टर समर्थक माधव बगाडे यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश केला. हा प्रवेश भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झाला. या संपूर्ण हालचालींमागे जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांची मास्टरमाइंड खेळी असल्याचे बोलले जात आहे.
जेसवानी हे वयोवृद्ध असले तरी त्यांनी केलेल्या विकासकामांमुळे ते सातत्याने राष्ट्रवादीकडून निवडून येत होते. २०१७मधील महापालिका निवडणुकीत भरत गंगोत्री यांनी आपल्या पॅनलमधून सर्व चार नगरसेवक निवडून आणले होते. त्यात जेसवानी व सुनिता बगाडे यांचाही समावेश होता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट निर्माण झाल्यावर भरत गंगोत्री अजित पवार गटात गेले. तर जेसवानी आणि माधव बगाडे शरद पवार गटातच राहिले. गौरी विसर्जनाच्या दिवशी भाजपचे वाढते शक्तीबळ पाहून अखेर जेसवानी यांनी दोन मुलांसह आणि बगाडे यांच्यासोबत भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला. या वेळी आमदार कुमार आयलानी, माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी, जमनू पुरसवानी, महेश सुखरामानी, लाल पंजाबी, शेरी लुंड, अमर लुंड, प्रशांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.