नवी मुंबईत गौरी-सह १७२३६ श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन

नवी मुंबईत गौरी-सह १७२३६ श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन

Published on

नवी मुंबईत गौरी-सह १७२३६ श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन
वाशी, ता. ३ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेत मंगळवारी सातव्या दिवशी गौरींसह श्रीगणेश विसर्जन सोहळा अत्यंत भावपूर्ण वातावरणात पार पडला. या दिवशी १७,२३६ श्रीगणेशमूर्ती आणि १,९५९ गौरींचे विसर्जन करण्यात आले. विसर्जन २२ नैसर्गिक तसेच १४३ कृत्रिम तलावांवर सुयोजित व्यवस्थेत पार पडले, ज्यामुळे नागरिकांनी आपल्या घराजवळच शांततेत विसर्जन केले.
महापालिकेने सर्व विसर्जन स्थळांवर सुसज्ज पोलिस यंत्रणा, सुरक्षा, स्वच्छता व ॲम्बुलन्स सुविधा ठेवली. सातव्या दिवशी विशेषतः ३,६०९ शाडूच्या श्रीमूर्तींचे विसर्जन करून नागरिकांनी पर्यावरणाबद्दल जागरूकता दर्शविली. या नागरिकांना महापालिका आयुक्तांच्या स्वाक्षरीचे पर्यावरणमित्र प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित केले गेले, जे अन्य नागरिकांनाही पर्यावरणपूरक वर्तनाची प्रेरणा देणारे ठरले. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ६ फूटापेक्षा कमी उंचीच्या श्रीमूर्ती विसर्जन कृत्रिम तलावातच करावे, या आवाहनाचा नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. १४३ कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये ११, २३५ श्रीगणेशमूर्ती विसर्जित केल्या गेल्या, तर नैसर्गिक जलाशयांमध्ये ६ फूटाहून उंच मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. नैसर्गिक विसर्जन स्थळांवर ३, ८६० घरगुती तसेच १८२ सार्वजनिक मंडळांच्या ४,०४२ श्रीमूर्ती विसर्जित केल्या गेल्या. कृत्रिम विसर्जन स्थळांवर १,१२७ श्रीमूर्ती तसेच २८ सार्वजनिक मंडळांच्या ११, २३५ श्रीमूर्ती विसर्जित झाल्या. यामुळे एकूण १५, ०६७ घरगुती व २१० सार्वजनिक मंडळांची १५, २७७ श्रीमूर्ती सातव्या दिवशी भावपूर्ण पद्धतीने विसर्जित झाली. यामध्ये शाडूच्या ३, ६०९ मूर्तींचे विसर्जन विशेषतः पर्यावरणपूरक दृष्टीकोन जपत केले गेले.
......................
कोटी
नवी मुंबईकरांनी पालिका क्षेत्रात पर्यावरणपूरक प्लॅस्टिकमुक्त श्रीगणेशोत्सव साजरा करण्यास उत्तम प्रतिसाद दिला. शाडूच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करणे तसेच कृत्रिम तलावात श्रीमूर्ती विसर्जन करणे अशा पर्यावरणपूरक वर्तनाचा अंगिकार केला आहे. अशाच प्रकारचे सहकार्य यापुढील अनंत चतुर्दशी होणा-या विसर्जन काळातही राखावे व पर्यावरणशील दृष्टीकोन जपत आपल्या गणेशमूर्तींचे घराजवळच्या कृत्रिम तलावात विसर्जन करावे.
- डॉ. कैलास शिंदे, आयुक्त, नवी मुंबई महापलिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com