गणवेश खरेदीसाठी कर्मचाऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम

गणवेश खरेदीसाठी कर्मचाऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम

Published on

दिनेश गोगी : सकाळ वृत्तसेवा
उल्हासनगर, ता. ४ : आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या धोरणात्मक निर्णयामुळे उल्हासनगर महापालिकेतील एक हजार ४६३ तृतीय व चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांना गणवेश व साहित्य खरेदीसाठी थेट त्यांच्या खात्यात धनादेश जमा करण्यात आला आहे. यामध्ये एक हजार ०१६ पुरुष कर्मचारी, ३६३ महिला कर्मचारी, अभियांत्रिकी विभागातील ४९, सुरक्षा रक्षक ४९ आणि अग्निशमन दलातील नऊ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

पूर्वी पालिकेतर्फे गणवेश, रेनकोट, गमबूट, चप्पल, साड्या, ब्लाउज आदी साहित्य खरेदी करून देण्यात येत असे. मात्र, दर्जाबाबत वारंवार तक्रारी होत असल्याने आयुक्तांनी थेट कर्मचाऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्याचा निर्णय घेतला. यानुसार प्रत्येक कर्मचाऱ्याच्या खात्यात साहित्य खरेदीसाठी ठराविक रक्कम वर्ग करण्यात आली. हा निर्णय अंमलात आणताना अतिरिक्त आयुक्त किशोर गवस, उपायुक्त डॉ. दीपाली चौगले, मुख्य लेखापरीक्षक अभिजित पिसाळ, सहाय्यक आयुक्त डॉ. सुनील लोंढे आणि भांडार विभागप्रमुख अंकुश कदम यांनी समन्वय साधला. याबाबतची माहिती जनसंपर्क अधिकारी अजय साबळे यांनी दिली.

महापालिकेने स्पष्ट केले आहे की, लाभार्थी पुरुष व महिला कर्मचाऱ्यांनी मिळालेल्या रकमेपोटी गणवेश व आवश्यक साहित्य खरेदी करून त्याचे चलन लेखा विभागाकडे ३० दिवसांच्या आत सादर करणे बंधनकारक असेल. तसेच संबंधित चलनांच्या प्रती भांडार विभागाकडे सादर करण्याची जबाबदारी विभाग प्रमुखांची राहील. ठराविक मुदतीत चलन सादर न केल्यास कर्मचाऱ्यांच्या देयकामधून ती रक्कम वसूल करण्यात येईल, असेही उपायुक्त डॉ. चौगले यांनी जारी केलेल्या पत्रात नमूद केल्याचे साबळे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com