माझा सोसायटी उत्सवात एकतेचे रंग
माझा सोसायटी उत्सवात एकतेचे रंग
सकाळ आयोजित स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
ठाणे, ता. ४ : आजच्या धावपळीच्या जीवनात संयुक्त कुटुंबांची संख्या कमी होत चालली आहेत; मात्र हाउसिंग सोसायटी हा आपल्या आयुष्याचा एक घट्ट धागा बनला आहे. वेगवेगळ्या जातीधर्मांचे लोक एकत्र येत सण-उत्सव, भजन, गाणी, खेळ अशा अनेक उपक्रमांतून आनंद वाटून घेतात. आपली हाउसिंग सोसायटी म्हणजेच एक विस्तारित कुटुंब होय. इथे जसे आनंद-दुःख वाटून घेतले जाते तसेच उत्साहाने सर्व सण-उत्सवदेखील साजरे होतात. त्यामुळे ‘माझा’ने सकाळच्या सहाय्याने ‘माझा सोसायटी उत्सव’ ही स्पर्धा आयोजित केली आहे.
स्पर्धेसाठी नावीन्यपूर्ण आरास (थीम सजावट, प्रकाश-ध्वनी, आकर्षक मूर्ती) आणि सामूहिक सादरीकरण (आरती, भजन, पारंपरिक कला, सर्व वयोगटांचा सहभाग) या दोन श्रेणींसाठी एकूण सहा पारितोषिके घोषित केली गेली आहेत. यामध्ये मुंबई, ठाण्यापासून बदलापूर, अंबरनाथपर्यंत तसेच कांदिवली, बोरिवलीपासून वसई-विरारपर्यंतच्या अनेक सोसायट्यांनी आपला सक्रिय सहभाग नोंदवला.
बक्षिसांची लयलूट
स्पर्धेतील विजेत्यांना ५० हजार रुपयांपर्यंतचे गिफ्ट व्हाउचर्स, ट्रॉफी आणि सन्मानचिन्हे देण्यात येणार आहेत. परीक्षकांकडून सादरीकरणांची छायाचित्रे, व्हिडिओज आणि काही ठिकाणी प्रत्यक्ष भेटीद्वारे परीक्षण सुरू आहे. निकालाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
सामूहिक सहभागाचे दर्शन
उत्सवाचा आनंद सर्वांपर्यंत पोहोचावा यासाठी ‘माझा’ स्टॉल्स सोसायट्यांमध्ये उभारले आहेत. ‘स्पिन द व्हील’सारखे खेळ, सेल्फी पॉइंट्स आणि विनामूल्य भेटवस्तूंमुळे सोसायटी रहिवासी आनंदात सहभागी होत आहेत. सहभागींसाठी ‘माझा’ बॉटल्स आणि टेट्रा पॅक्स भेट म्हणून दिले जात आहेत. तरुण-तरुणी, महिला-पुरुष सर्वजण #MaazaSocietyFestival हॅशटॅगसह फोटो आणि स्टोरीज पोस्ट करीत आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून कल्पकता, एकता आणि सण-उत्सवातील सामूहिक सहभागाचे सुंदर दर्शन घडले.
परीक्षकांची कसोटी
‘माझा’ने तयार केलेला क्यूआर कोड ‘नवा अवतार’ हा सध्या अत्यंत कौतुकाचा विषय ठरला आहे. क्यूआर कोडवर आधारित नवा अवतार अॅपद्वारे लोक आपला अवतार तयार करू शकतात. प्रत्येक सोसायटीने सादर केलेली कला, आरास आणि कार्यक्रमांनी परीक्षकांचीही कसोटी लागणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.