पालिकेच्या प्रभाग रचनेबाबत ४१० हरकती आणि सूचना प्राप्त
पालिकेच्या प्रभागरचनेबाबत
४१० हरकती आणि सूचना प्राप्त
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ ः महापालिका प्रभागरचना प्रारूप आराखड्याबाबत आतापर्यंत सुमारे ४१० हरकती आणि सूचना दाखल झाल्या आहेत. आज सायंकाळी उशिरापर्यंत हरकती आणि सूचना यांबाबत माहिती संकलन सुरू होते. हरकती आणि सूचना यांच्या संख्येत आणखी अधिक वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
यंदाच्या मुंबई महापालिका निवडणुका २०१७ मध्ये तयार करण्यात आलेल्या प्रभागरचनेवरच होणार असल्याने फार मोठा बदल झालेला नाही. लोकसंख्या वाढल्यास किंवा कमी झाल्यास, प्रत्येक वॉर्डमध्ये साधारणपणे समान नव्या फेरचरनेत होणार आहे. त्याबाबत काही हरकती आणि सूचना आल्याचे पालिकेच्या सूत्रांनी सांगितले. शहराचे प्रशासन अधिक सुलभ करण्यासाठी वॉर्डची पुनर्रचना केली जाते. त्यानुसार प्रभागांची हद्द बदलाबाबत काही हरकती आणि सूचना आल्याचे सांगण्यात आले. मुंबई शहर आणि उपनगरात २४ प्रशासकीय वॉर्ड आहेत. त्यात २२७ प्रभागात निवडणूक होणार आहे. प्रभागाचे प्रारूप ठरविताना हद्दीची फेररचना केल्याबद्दल सत्ताधारी पक्षाला मोठा फायदा होणार असल्याची भीती विरोधी पक्षांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे त्यांच्या काही हरकती आल्याचे समजते.
---
६ ऑक्टोबरला रचना अंतिम
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची प्रतीक्षा सर्वच राजकीय पक्ष, नेते, माजी नगरसेवकांसह निवडणूक रिंगणात उतरणाऱ्या इच्छुकांना लागून राहिली आहे. मुंबई महापालिकेने प्रभागरचनेचे काम पार पाडले असून, ही प्रभागरचना अंतिम करण्यात येणार आहे. मुंबईकरांकडून २२ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधीत हरकती आणि सूचना मागविल्या होत्या. पालिका आयुक्त भूषण गगराणी हे हरकती आणि सूचनांबाबत सुनावणी घेणार आहेत. ६ ऑक्टोबरपर्यंत प्रभागरचनेचे प्रारूप अंतिम करण्याचे नियोजन केले जात आहे.
------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.