तीन वर्षे आरोपींचा शोध घेण्याबाबत पोलिसांमध्ये उदासिनता - उच्च न्यायाल

तीन वर्षे आरोपींचा शोध घेण्याबाबत पोलिसांमध्ये उदासिनता - उच्च न्यायाल

Published on

आरोपींचा शोध घेण्याबाबत पोलिस उदासीन
उच्च न्यायालयाचे पोलिसांच्या चौकशीचे आदेश 

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ ः वीस वर्षांच्या तरुणाच्या अपघाताच्या मृत्यूच्या चौकशीत उदासीनता दाखवल्याबद्दल उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांवर ताशेरे ओढले. नागरिकांना अपेक्षित कामगिरी पोलिस करीत नाहीत, अशी टीकाही न्यायालयाने केली. कर्तव्यात कसूर करून सदोष तपास करणाऱ्या संबंधित पोलिस अधिकाऱ्याविरुद्ध विभागीय चौकशी करण्याचे आदेशदेखील न्यायालयाने राज्याच्या पोलिस महासंचालकांना दिले.

न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर या प्रकरणाच्या तपासाला गती मिळाली, असेही न्या. रवींद्र घुगे आणि न्या. गौतम अंखड यांच्या खंडपीठाने नोंदवले. तसेच, कनिष्ठ न्यायालयाने खटला जलदगतीने चालवून तो एका वर्षाच्या आत पूर्ण करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे मुलाच्या अपघाती निधनासाठी जबाबदार ट्रकचालकाचा पोलिस योग्यप्रकारे शोध घेत नसल्याचा दावा करून बबिता झा यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तसेच, मुलाच्या मृत्यूसाठी जबाबदार ट्रकचालकाला शोधून अटक करण्याचे आदेश पोलिसांना देण्याची मागणी केली होती. 

एका तरुणाने १७ ऑगस्ट २०२२ रोजी भरधाव ट्रकच्या धडकेत जीव गमावला; मात्र आरोपीला शोधण्यात आणि आरोपपत्र दाखल करण्यासाठी पोलिसांना तीन वर्षे लागली आहेत, असा टोला न्यायालयाने हाणला. तसेच, गेल्या तीन वर्षांत पोलिसांनी आरोपीला शोधण्यासाठी प्रयत्न का केले नाहीत, हे न उलगडण्यासारखे असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे.  याचे परिणाम भोगण्याचा इशारा न्यायालयाने दिल्यानंतरच पोलिसांच्या तपासाला गती मिळाली, हे स्पष्ट होत असल्याचेही न्ययालयाने सुनावले. असा उदासीन दृष्टिकोन अयोग्य आहे. पोलिस अधिकारी नागरिकांना अपेक्षित असलेले काम करण्यात कमी पडले आहेत, असे ताशेरेही न्यायालयाने ओढले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com