गणरायाच्या मूर्तींच्या विसर्जनासाठी पालिका सज्ज

गणरायाच्या मूर्तींच्या विसर्जनासाठी पालिका सज्ज

Published on

विसर्जनासाठी पालिका सज्ज
कृत्रिम तलावांना प्राधान्य देण्याचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ ः श्रीगणरायाला उद्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी निरोप देण्यासाठी विविध सोयीसुविधा महानगरपालिका सज्ज झाली आहे. विसर्जनासाठी ७० नैसर्गिक स्थळे आणि सुमारे २९० कृत्रिम तलाव उपलब्ध केले आहेत. निर्माल्य कलश, नियंत्रण कक्ष, निरीक्षण मनोरे, विद्युत व्यवस्था, रुग्णवाहिका आदी सुविधाही पालिकेने पुरविल्या आहेत.
महापालिकेचे १०,००० अधिकारी आणि कर्मचारी विसर्जनस्थळांवर तैनात आहेत. २४५ नियंत्रण कक्ष कार्यरत आहते. मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी मंडळांना केले आहे. विसर्जनस्थळी पावित्र्य आणि शिस्त राखावी, यासाठी मुंबई महापालिका आणि मुंबई पोलिसांच्या सूचना पाळाव्यात. गर्दीत सतर्क राहावे, जबाबदारीने वागावे, असे आवाहन पालिका आणि पोलिसांनी केले आहे. विसर्जनस्थळांच्या ठिकाणी आरोग्य सुविधा आणि प्रकाश व्यवस्था केली आहे.
...
कृत्रिम तलावांची माहिती गुगलवर
२९० कृत्रिम तलावांची यादी  www.mcgm.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यामध्ये गुगल मॅप लिंकसह उपलब्ध क्यूआर कोड स्कॅन किंवा बीएमसी व्हॉट्सॲप चॅटबोट ८९९९२२८९९९ वरून माहिती उपलब्ध केली आहे.
...
जेलीफिश माशांचा धोका
मत्स्यदंश आणि सागरी सुरक्षिततेच्या दृष्टीने ऑगस्ट-ऑक्टोबरमध्ये ‘ब्लू बटन जेलीफिश’, ‘स्टिंग रे’ यांपासून सावध राहण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. मत्स्यदंश झाल्यास वैद्यकीय कक्ष व १०८ रुग्णवाहिका उपलब्ध आहे.
...
भरती-ओहोटी
शनिवारी (ता. ६) सकाळी ११.०९ समुद्राला मोठी भरती असून ४.२० मीटर उंचीच्या लाटा समुद्रात उसळणार आहेत. समुद्राला सायंकाळी ५.१३ वाजता ओहोटी असेल. रात्री ११.१७ वाजता भरती येणार असून ३.८७ मीटर भरती लाटा असतील. ७ सप्टेंबरला पहाटे ५.०६ वाजता भरती असून ०.६९ मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. ओहोटीची वेळ रात्री ११.१७ वाजता आहे.
...
भाविकांना आवाहन
समुद्राच्या खोल पाण्यात जाऊ नका. प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची मदत घ्या. काळोखाच्या जागी व निषिद्ध क्षेत्रात विसर्जन टाळा. बुडणारी व्यक्ती दिसल्यास तत्काळ सूचना द्या, अफवा पसरवू नका, अफवांवर विश्वासही ठेवू नका, लहान मुलांची विशेष काळजी घ्या, असे आवाहन पालिकेने भाविकांना केले आहे.
...
तयारी अशी...
छोट्या मूर्ती विसर्जनासाठी - ६६ जर्मन तराफे
जीवरक्षक - २,१७८
मोटरबोटी - ५६
क्रेन - ४२
स्वागत कक्ष - २८७
प्रथमोपचार केंद्रे - २३६
रुग्णवाहिका - ११५
रात्रीच्या विसर्जनासाठी फ्लडलाइट्स - ६,१८६
सर्चलाइट्स - १३८
तात्पुरती शौचालये - १९७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com