‘ऑपरेशन सिंदूर’ देखाव्यातून शौर्याला मानवंदना

‘ऑपरेशन सिंदूर’ देखाव्यातून शौर्याला मानवंदना

Published on

‘ऑपरेशन सिंदूर’ देखाव्यातून शौर्याला मानवंदना
नेहरूनगर सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाचा उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : नेहरूनगर सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाने यावर्षी ‘ऑपरेशन सिंदूर’ विषयावर देखावा साकारून भारतीय जवानांच्या शौर्याला मानवंदना दिली आहे. नेहरूनगरचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या या मंडळाने १९६७ पासून समाजप्रबाेधनाची परंपरा कायम राखली आहे. तरुणांबराेबरच ज्येष्ठ नागरिकही उत्साहाने विविध उपक्रमांत सक्रिय सहभाग घेतात.

राष्ट्रीय एकात्मता व सामाजिक बांधिल‌कीचा वारसा जपणाऱ्या या मंडळाचे हे ५९वे वर्ष आहे. या मंडळाचे सल्लागार आणि स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना काळात विविध समाजाेपयाेगी कामे करण्यात आली. आरोग्य आणि रक्तदान शिबिरांबराेबरच मंडळ तीन वर्षे ‘एक वही, एक पेन’ उपक्रम राबवत आहे. या उपक्रमांतर्गत मंडळाचे सदस्य गणेशभक्तांना गणरायाला फुल किंवा हार न आणता शालेय वस्तू आणण्याचे आवाहन करतात. त्याला गणेशभक्तांकडून चांगला प्रतिसाद मिळाला असून, जमा झालेले साहित्य शहापूर येथील स्वामी विवेकानंद आदिवासी शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे.
--
नऊ मिनिटांचा शो
‘ऑपरेशन सिंदूर’ विषयावर देखावा करून समाजप्रबोधन करण्याचा मंडळाचा मानस आहे. या देखाव्याची संकल्पना आमदार मंगेश कुडाळकरांची असून, नेपथ्यकर संदेश बेंद्रे यांनी हा देखावा साकारला आहे. तसेच दहा फूट उंचीची ‘श्रीं’ची मूर्ती कागदाच्या लगद्यापासून बनवलेली आहे.
===
समाजातील दुर्बल घटकांसाठी काम करता यावे तसेच समाजात एकोपा निर्माण करून प्रेमभावना आणि बंधुभाव वाढीस लागावा. गरजू व्यक्तींना मदतीचा हात देण्यासाठी गणरायांच्या आशीर्वादाने आम्हाला बळ मिळो.
- रोहन पाटील, अध्यक्ष, नेहरूनगर सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ
==
नेहरूनगर सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ विविध सामाजिक उपक्रम राबवून जनसेवा करत आहे. मंडळाने यावर्षी ‘ऑपरेशन सिंदूर’ विषयावर देखावा करून भारतीय जवानांची शौर्यगाथा मांडली आहे.
- गीतेश माने, मुख्य सचिव, नेहरूनगर सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com