मद्यपी शाळा बसचालकाला अटक

मद्यपी शाळा बसचालकाला अटक

Published on

मद्यपी शाळा बसचालकाला अटक
भाईंदर, ता. ५ (बातमीदार) : मद्यप्राशन करून शाळेची बस चालवणाऱ्या चालकाला वाहतूक पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत ताब्यात घेतले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. गुरुवारी (ता. ४) दुपारी भाईंदर पूर्वच्या गोल्डन नेस्ट चौकात ही घटना घडली.

गोल्डन नेस्ट चौकाजवळ गुरुवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस चालक ज्या पद्धतीने चालवत होता; ते पाहून त्या ठिकाणी कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसांनी ही बस तातडीने थांबवली. त्यात तीन ते चार विद्यार्थी होते. प्रथमदर्शनी बसचालकाने मद्यप्राशन केल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. चालकाची ब्रिथ एनालाईझर यंत्राने तपासणी केली असता बसचालकाने मद्यप्राशन केले असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले तसेच बसमधील विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क साधला व त्यांना बोलावून घेत त्यांची मुले त्यांच्या ताब्यात देण्यात आली. वाहतूक पोलिसांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला आहे. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक सयाजी मोहिते, हवालदार अमोल देखणे पाटील, हवालदार राहुल मुदगल यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com