कल्याणमध्ये २२ तास बत्ती गुल

कल्याणमध्ये २२ तास बत्ती गुल

Published on

कल्याणमध्ये २२ तास बत्ती गुल
संतप्त व्यापाऱ्यांचा महावितरणविरोधात बंद

कल्याण, ता. ५ (वार्ताहर) : कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पुष्पराज हॉटेल मार्ग परिसरातील व्यापारी भाग गुरुवारी (ता. ४) सायंकाळपासून तब्बल २२ तास अंधारात बुडाला होता. वीजवाहिनीत अचानक झालेल्या बिघाडामुळे वीजपुरवठा खंडित झाला. हा पुरवठा शुक्रवार दुपारी ३ वाजेपर्यंत सुरळीत झाला नव्हता. ऐन सणासुदीच्या काळात वीजपुरवठा बंद राहिल्याने व्यापारीवर्गामध्ये संतापाची लाट उसळली आणि त्यांनी दुकाने बंद ठेवून महावितरणविरोधात आपला रोष व्यक्त केला. या वेळी माजी आमदार नरेंद्र पवार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत महावितरण, पालिका प्रशासन आणि वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर वीजवाहिनी दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले.

दरवर्षी लाखो रुपयांची वीजबिले भरूनही महावितरणकडून योग्य सेवा मिळत नाही. प्रत्येकवेळी उडवाउडवीची उत्तरे देऊन अधिकाऱ्यांकडून टोलवाटोलवी केली जाते. त्यामुळे आम्हाला तोटा सोसावा लागतो. सणासुदीच्या काळात दुकानदारांना विक्रीतून मोठी कमाई अपेक्षित असते, मात्र सलग २२ तास वीजपुरवठा बंद राहिल्याने व्यवहार ठप्प झाले. काही व्यापाऱ्यांच्या दुकानातील मिठाई, दुग्धजन्य पदार्थ आदी वस्तूंनाही फटका बसल्याचे सांगत व्यापाऱ्यांनी महावितरणचा निषेध व्यक्त केला. व्यापारीवर्गाच्या या आक्रमक भूमिकेमुळे आणि माजी आमदारांच्या पाठपुराव्यामुळे महावितरणने तत्काळ मनुष्यबळ आणि तांत्रिक कर्मचारी घटनास्थळी पाठवले. दुपारनंतर दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. पुढील काही तासांतच हा वीजपुरवठा सुरळीत होईल, असे महावितरणकडून सांगण्यात आले.


महावितरण अपयशी
वीजबिल नियमित भरूनही व्यापाऱ्यांना मूलभूत सेवा देण्यात महावितरण अपयशी ठरत असून, हे अत्यंत गंभीर असल्याचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी सांगितले. त्यावर नवीन वीजवाहिनीच्या कामासाठी रस्ता खोदण्यासाठी आम्ही पालिका प्रशासनाकडे पाच महिन्यांपूर्वी अर्ज केला आहे, मात्र त्यांच्याकडून अद्यापही परवानगी मिळाली नसल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी पवार यांना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com