मुंबई
ठाण्यातून दोन सखेभाऊ बेपत्ता
ठाण्यातून दोन सख्खे भाऊ बेपत्ता
ठाणे, ता. ७ : शहरातील कासारवडवली भागातून दोन सख्खे भाऊ अचानक बेपत्ता झाले आहेत. ही मुले १३ आणि ११ वर्षांची असून, बुधवारी (ता. ३ ) रोजी घरातून कोणालाही न सांगता निघून गेली. पूर्वीदेखील ही मुले तीन ते चार वेळा अशाच प्रकारे न सांगता बाहेर गेली होती आणि १० ते १२ दिवसांनी परत आली होती; मात्र या वेळी दोन दिवस होऊनही ती घरी परतली नाहीत. त्यामुळे त्यांना कोणी फूस लावून पळवून नेले असावे, असा संशय पालकांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी कासारवडवली पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मुलांचा शोध घेतला जात आहे.