गणेशोत्सव संपताच खवय्यांची मांसाहारासाठी गर्दी
तुर्भे, ता. ७ (बातमीदार) : गणपतीच्या विसर्जनानंतर लगेच दुसऱ्या दिवशी रविवार आल्याने नवी मुंबई शहरातील चिकन, मासे, मटण विक्रीच्या दुकानांत सकाळपासून ग्राहकांची मोठी गर्दी उसळली होती. शहरातील बाजारपेठेमध्ये मासळी खरेदीसाठी गर्दी वाढली. परिणामी मासळीचे भावदेखील श्रावणपेक्षा रविवारी (ता. ७) वाढले होते.
गणेशोत्सवानंतर अनेक मांसाहारप्रेमींनी बाजारात मासे, मटण, चिकन खरेदीला गर्दी केली. श्रावण, तसेच त्यापाठोपाठ येणारा गणेशोत्सव या कालावधीत अनेकजण मांसाहार करणे टाळतात. अनंत चतुर्दशीला गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर खवय्ये पुन्हा मांसाहाराकडे मोर्चा वळवतात. यंदा अनंत चतुर्दशीनंतर लागूनच रविवार आल्यामुळे मांसाहारप्रेमींसाठी ही पर्वणी ठरली. सकाळपासून नवी मुंबईतील मांसविक्रीच्या दुकानांत ग्राहकांनी गर्दी केल्याचे दिसून आली. तसेच दिवाळे येथील मासळी मार्केटसह शिरवणे, वाशी आदी ठिकाणी भरणाऱ्या बाजारात खवय्यांनी मासळी खरेदीसाठी गर्दी केली होती.
श्रावण आणि त्यापाठोपाठ येणारा गणेशोत्सव जवळपास या एक महिन्याच्या कालावधीत अनेकजण मांसाहाराचे सेवन करणे टाळतात. त्यामुळे या काळात मांसाहार खरेदीसाठी बाजारपेठा तुलनेने ओस पडतात. यंदा ११ दिवसांनंतर शनिवारी (ता. ६) गणपतीचा विसर्जन सोहळा उत्साहात पार पडला. दुसरा दिवस सुट्टीचा असल्यामुळे शहरातील चिकन, मासे, मटण विक्रीच्या दुकानांत ग्राहकांची मोठी गर्दी उसळली होती. काहींनी तर थेट भाऊच्या धक्क्यावर जाऊन मासळी खरेदी केली.
मागणीचा भावावर परिणाम
एक महिन्यानंतर चिकण-मटनच्या मागणीत वाढ झाल्यामुळे काही विक्रेत्यांनी किंचित भावात वाढ केल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या मटण ८०० रुपये प्रतिकिलोने, तर चिकण २२० ते २५० रुपये प्रतिकिलोने विक्री केले जात आहे.
माशांचे भाव (प्रतिकिलो)
सुरमई १५०० ते १७०० (आकारानुसार)
पापलेट १८०० ते २१०० (आकारानुसार)
हलवा १२०० ते १५००
जिताडा ७०० ते १०००
कोळंबी ८०० ते १०००
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.