विकसकाच्या जागेवर अतिक्रमणाचा प्रयत्न
अंबरनाथ, ता. ७ (वार्ताहर) : अंबरनाथमध्ये एका विकसकाच्या जागेवर वारंवार अतिक्रमणाचा प्रयत्न झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी विकसकाने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आठ ते दहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला. मात्र, विरोधी पक्षकाराची बाजू मांडण्यासाठी गेलेल्या वकिलावरही गुन्हा दाखल झाल्याने वकील संघटना आक्रमक झाली आहे. त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला.
अंबरनाथ पूर्वेतील सचिन शहा हे बांधकाम व्यावसायिक पालेगाव येथे अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांनी ७२ गुंठे जमीन सुदामा भोईर व ओमकार म्हसकर यांच्याकडून खरेदी केली आहे. त्याचबरोबर सर्व्हे नं. ४६/३/अ या जमिनीवर व्यावसायिक इमारतीचा आराखडा मंजूर झालेला असतानाही, ३ सप्टेंबरला सकाळी आठच्या सुमारास मनोहर देसाई, समीर देसाई, अक्षय देसाई, नंद जेठाणी व त्यांचा मुलगा, सुभाष कांबळे, वैभव थोरवे, नरेश वारींगे व दीपक माणेरकर यांनी लोखंडी कंटेनर आणून अतिक्रमणाचा तिसऱ्यांदा प्रयत्न केला, अशी तक्रार शहांनी केली. घटनेच्या वेळी सुपरवायझर मनोज जाधव व इंजिनिअर सचिन पाटील उपस्थित होते. या वेळी वारींगे यांनी हातात कोयता घेऊन विकसक शहा यांना धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या आधारावर पोलिसांनी आठ ते दहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात ॲड. अक्षय देसाई यांच्यावरही गुन्हा दाखल झाल्याने उल्हासनगर वकील संघटना आक्रमक झाली. गुरुवारी संध्याकाळी संघटनेच्या सदस्यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात धडक देत कारवाईचा निषेध नोंदवला.
----------------------
बऱ्याच दिवसांपासून आमचा सहकारी अक्षय देसाई याच्यावर अन्याय होत आहे. पोलिसांची दडपशाही सुरू असून याला वकील संघटना सहन करणार नाही. पक्षकाराच्या मदतीला वकील गेला, तर त्याला आरोपी कसे बनवले जाते? वकिलांनी पक्षकारासाठी, जनतेसाठी काम करायचे नाही का?. देसाई हे एकटे नसून महाराष्ट्रातील सर्व वकील त्यांच्यासोबत आहेत. त्यांच्यावरील खोटे गुन्हे तत्काळ मागे घेण्यात यावेत; अन्यथा जनआंदोलन करण्यात येईल.
- सचिन खंडागळे, वकील संघटनेचे उपाध्यक्ष
अंबरनाथ : ॲड. अक्षय देसाई यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने उल्हासनगर वकील संघटनेने पोलिस ठाण्याबाहेर निषेध नोंदवला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.