टीओकेतील माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश
उल्हासनगर, ता. ७ (बातमीदार) : २०१७च्या उल्हासनगर महापालिका निवडणुकीत भाजपला पहिल्यांदाच महापौरपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या टीम ओमी कलानी (टीओके)ला आता गळती लागली आहे. टीओकेमधील काही माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा मुंबईतील महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात पार पडला.
महापालिकेची स्थापना १९९६मध्ये झाल्यानंतर पहिली निवडणूक १९९७ मध्ये झाली होती. त्यानंतर भाजपला एकदाही महापौरपद मिळाले नव्हते; मात्र २०१७च्या निवडणुकीत ओमी कलानी यांनी भाजपशी हातमिळवणी करून पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली आणि त्यातून पक्षाला पहिल्यांदा महापौरपद मिळाले. तथापि, अडीच वर्षांनंतर राज्यात सत्तापरिवर्तन होताच ओमी कलानी मविआत सहभागी झाले होते. सध्या येणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टीओकेमधील माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी केलेल्या या प्रवेशामुळे कलानी पुढे कोणती रणनीती आखणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या वेळी आमदार कुमार आयलानी, प्रदेश प्रवक्ता श्वेता शालिनी, जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया, महेश सुखरमानी, जमनु पुरस्वानी, प्रकाश माखीजा, प्रदीप रामचंदानी, प्रशांत पाटील, राजू जग्यासी, रामचार्ली पारवानी, अमित वाधवा, उल्हासनगर शॉपकीपर्स असोसिएशनचे अध्यक्ष दीपक छतलानी, मनोज साधनानी, अवि पंजाबी, अमर लुंड, शेरी लुंड, लाल पंजाबी, नवीन दुसेजा, लक्की नथानी, डॉ. एस. बी. सिंह उपस्थित होते.
पक्षप्रवेशात यांचा समावेश
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये माजी नगरसेवक प्रभुनाथ गुप्ता, संजयसिंह चाचा, मंगल वाघे, छाया चक्रवर्ती, पदाधिकारी बाबू गुप्ता, हेमा पिंजानी, सुचित्रा सिंह, सूरज भारवानी, किशन लचानी, चांदनी श्रीवास्तव, मनीषा मेथवानी, दशरथ खैरनार यांचा समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.