पनवेलमध्ये भावपूर्ण वातावरणात ६ हजार ६०० हून अधिक गणेशमूर्तींचे विसर्जन;
पनवेलमध्ये भावपूर्ण वातावरणात सहा हजार ६०० हून अधिक गणेशमूर्तींचे विसर्जन
पर्यावरणपूरक उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पनवेल, ता. ७ (बातमीदार) : पनवेल महापालिका क्षेत्रातील कळंबोली, कामोठे, पनवेल व खारघर या चारही प्रभागांत शनिवारी अनंत चतुर्दशी दिवशी भावपूर्ण वातावरणात व भक्तिमय जल्लोषात सुमारे सहा हजार ६३९ पेक्षा अधिक घरगुती व सार्वजनिक गणेशमूर्तींचे शांततेत, नियोजनबद्धरीत्या विसर्जन करण्यात आले.
‘माझी वसुंधरा ६.०’अंतर्गत स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त पनवेलसाठी महापालिकेकडून ‘उत्सव गणरायाचा, जागर पर्यावरणाचा’ ही मोहीम राबविण्यात आली. आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली बांधकाम, आरोग्य, विद्युत, परवाना, भांडार, वाहन, वैद्यकीय व पर्यावरण अशा आठ विभागांत समन्वय साधून सर्व विसर्जन घाटांवर संपूर्ण तयारी करण्यात आली होती. यामध्ये लायन्स क्लब पनवेलसह अनेक सामाजिक संस्था आणि एनजीओंनी सहकार्य केले. महापालिकेच्या वतीने यंदा १३४ ठिकाणी विसर्जनाची सोय करण्यात आली होती. त्यात ५८ नैसर्गिक विसर्जन स्थळे आणि ७६ कृत्रिम तलावांचा समावेश होता. या ठिकाणी सुरक्षा रक्षक, सीसीटीव्ही, प्रकाशयोजना, टॉवर, टेबल-खुर्च्या, लाऊडस्पीकर, निर्माल्य कलश, लाइफ जॅकेट्सची सुविधा तसेच मोठ्या गणेशमूर्तींसाठी हायड्रॉलिक क्रेन व ट्रॉलीची सोय करण्यात आली होती. कृत्रिम तलावात मूर्ती विसर्जन करणाऱ्या नागरिकांना महापालिकेच्या वतीने विशेष प्रमाणपत्र देण्यात आले.
आयुक्त मंगेश चितळे, सर्व उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, प्रभाग अधिकारी व अग्निशमन विभागाने प्रत्यक्ष स्थळांना भेट देऊन व्यवस्थापन पाहिले. शेवटच्या मूर्तीपर्यंत अधिकारी व कर्मचारी कार्यरत राहून विसर्जन कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यात आला. विसर्जन स्थळांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त, अग्निशमन दल व आरोग्य विभागाकडून प्राथमिक उपचार केंद्राची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.